दिल्ली विधनासभा निवडणूक – २०२० साठीचा प्रचार आज संपला आहे. मात्र, या निवडणूक प्रचारादरम्यान केलेले एक वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. १ फेब्रुवारी रोजी त्यांनी केलेल्या भाषणा  बद्दल ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे. याप्रकरणी त्यांना ७ फेब्रवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्री योगी सभेत भाषाण दरम्यान मुख्यमंत्री केजरीवाल हे शाहीनबागमधील आंदोलकांना बिर्याणी खाऊ घालतात, असं म्हटलं होतं. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, प्राथमिकदृष्ट्या अशाप्रकारचे वक्तव्य करून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विकासपूरी येथे सभा झाली होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानी मंत्र्यांनी केजरीवालांच्या केलेल्या समर्थनाचा संबंध शाहीन बाग आंदोलनाशी जोडला होता. “पाकिस्तानी मंत्री अरविंद केजरीवालांचे समर्थन यासाठी करतात कारण, तेच शाहीन बागमध्ये बिर्याणी खायला घालू शकतात.” असं ते म्हणाले होते.