भाजपा सरकारच्या काळात मतदान प्रक्रियेत अमुलाग्र बदल घडवणाऱ्या व्हीव्हीपीएटी मशिन्सबाबत म्हणजेच वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल या मतदान यंत्राबाबत मोठी माहिती समोर येत आहे. देशभरातील जवळपास ३७ टक्के व्हीव्हीपीएटी मशिन्स ‘डिफेक्टिव्ह’ म्हणजेच सदोष असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यासंदर्भात दि वायर या वृत्तस्थळाने वृत्त दिले आहे. धक्कादायक म्हणजे याच व्हीव्हीपीएटी मशिन्स २०१८ नंतर झालेल्या सर्व निवडणुकांकरता वापरण्यात आल्या होत्या.

हेही वाचा >> लोकांचे जीव धोक्यात आहेत आणि तुम्ही राजकारण करताय? परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची काँग्रेस नेत्यावर आगपाखड

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…
man molests 15 year minor girl in running local train
रेल्वेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

निवडणूक प्रक्रिया सुरळीत, सोपी आणि पारदर्शक असावी याकरता मोदी सरकारने व्हीव्हीपीएटी मशिन्स कार्यान्वित केल्या. यामुळे पारंपरिक बॅलेट पेपरवर होणारी मतदान प्रक्रिया बंद झाली. मात्र, व्हीव्हीपीएटी मशिन्सला विरोधकांनी विरोध दर्शवला. बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हाव्यात याकरता संसदेसह सगळीकडे विरोधकांनी हल्लाबोल केला. परंतु, केंद्र सरकार व्हीव्हीपीएटी मशिनवर ठाम राहिली. परंतु, कार्यान्वित असलेले जवळपास ६.५ लाख मशिन्स सदोष असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांनी या मशिन्स आता पुन्हा संबंधित उत्पादक कंपन्यांना परत पाठवल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या मशिन्स एम ३ जनरेशन श्रेणीतील म्हणजे अद्ययावत श्रेणीतील होत्या. ही श्रेणी २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत १७.४ लाख मशिन वापरण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक तृतीयांश म्हणजे ३७ टक्के (६.५ लाख) मशिन्स सदोष असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाला आढळले.

हेही वाचा >> सरकार-न्यायालय खडाजंगी!, समलिंगी विवाहांबाबत मुद्दय़ांच्या सुनावणी प्राधान्यक्रमावरून वाद

उत्पादक कंपन्या कोणत्या?

सदोष मशिन्स बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी हैदराबाद येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या उत्पादक कंपनीकडे मशिन्स परत पाठवण्यात आले आहेत. EVTEA 0001 to EVTEA 99999 या श्रेणीतील या मशिन्स आहेत. तर दुसरीकडे बंगळुरूतील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीकडून घेतलेल्या BVTAK 00001 to BVTAK 30000, BVTEA 00001 to BVTEA 30000 and BVTEC 05001 to BVTEC 75000 या श्रेणीतील मशिन्सही सदोष आढळल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय केंद्रीय निवडणूक आयोगाने त्या परत पाठवल्या आहेत. या कंपनीकडून घेतलेल्या एकूण मशिन्सपैकी २५ ,३५० मशिन्स सदोष आढळल्या असून त्यापैकी BVTEH 00001 to BVTEH 68500 श्रेणीतील यंत्रणा BEL कडे परत पाठवण्यात आल्या आहेत.

व्हीव्हीपीएटी मशिन २०१८ मध्ये कार्यान्वित करण्यात आले होते. २०१८ नंतर झालेल्या सर्व मतदान प्रक्रियेकरता या मशिन्स वापरण्यात आल्या. तसंच, या मशिन्स सदोष आढळल्यानंतर त्या कंपनीकडे परत पाठवण्यात आल्या असून निर्दोष मशिन्स पुन्हा संबंधित जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने दि वायरने दिली आहे.