कर्नाटकात विधानसभा निवडणुकीला काही दिवसच बाकी असताना भारतीय निवडणूक आयोग काँग्रेसचे निवडणूक चिन्ह हाताचा पंजा रद्द करण्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी घेणार आहे. १८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता ही सुनावणी होणार आहे. निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
Election Commission of India to hear a petition seeking cancellation of Congress's election symbol 'Palm of Hand' on April 18 at 3 pm.
— ANI (@ANI) April 12, 2018
याच वर्षी जानेवारी महिन्यांत भाजपाचे नेते अश्विनी उपाध्याय यांनी आपल्या याचिकेत निवडणूक आयोगाकडे हाताच्या पंजाचे निवडणूक चिन्ह रद्द करण्याची मागणी केली होती. कारण हात मानवी शरीराचा एक भाग आहे. त्यामुळे निवडणुकीत हे चिन्ह म्हणून वापरणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे त्यांनी म्हटले होते.
