लोकसभा निवडणुकीवेळी केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्यावरून पी. ए. संगमा यांच्या राष्ट्रीय जनता पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने काढून घेतली आहे.
राष्ट्रपतिपदासाठी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर स्वत:च्या पक्षाची स्थापना संगमा यांनी केली होती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळी रालोआमध्ये ते सहभागी झाले होते. या निवडणुकीचा खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे जमा न केल्याने दोन वेळा नोटीस पाठविण्यात आली होती. शेवटची नोटीस १७ मार्च २०१५ ला पाठविण्यात आली. यावर कोणतेही उत्तर न आल्याने शेवटी आयोगाने कारवाईचा बडगा उगारत थेट मान्यताच रद्द केली आहे. यामुळे खर्च लपवणाऱ्या पक्षांवर वचक बसणार आहे.