Exit Poll 2026 State-wise Predictions & Opinion Poll Results: राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीनंतर आता पाच राज्यांच्या निकालांची उत्सुकता निर्माण झाली आहे. आज पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या म्हणजेच शेवटच्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर पाच राज्यांच्या निवडणूक निकालांबाबतच्या एक्झिट पोलचे आकडे हा चर्चेचा विषय ठरला आहे. येत्या ४ मे रोजी पाचही राज्यांमध्ये एकाच वेळी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर केले जातील. त्या निकालांचा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून मतदारांना मिळू शकतो.

Live Updates

Election Exit Poll 2026 Live Updates Who Will Form Government : पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ व पुदुच्चेरी निवडणुकांचे एक्झिट पोल

22:04 (IST) 29 Apr 2026
Tamil Nadu Exit Polls 2026: टीव्हीकेला शंभरहून अधिक जागा मिळणार; ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलचा अंदाज

तमिळनाडूमध्ये अनेकांनी स्टॅलिन पुन्हा सरकार स्थापन करेल असा अंदाज व्यक्त केला असातना, ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने मात्र अभिनेता विजय यांच्या तामिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे नाट्यमय पदार्पण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या पोलनुसार २३४-सदस्यीय विधानसभेत या टीव्हीकेला ९८ ते १२० जागा मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

21:27 (IST) 29 Apr 2026

West Bengal Exit Poll 2026: भाजपा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार - सुवेंदू अधिकारी

पश्चिम बंगालमधील भाजपाचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांची एक्झिट पोलनंतर महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपाला १८० हून अधिक जागा मिळत असून भाजपा सहज सत्ता स्थापन करेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

https://twitter.com/PTI_News/status/2049511094826447288

21:07 (IST) 29 Apr 2026

West Bengal Exit Poll 2026: पश्चिम बंगालमध्ये १९४७ नंतर सर्वाधिक मतदान

पश्चिम बंगालमध्ये आज (२९ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ९२.४७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार हे ४ मे च्या निकालातून समोर येईल.

20:40 (IST) 29 Apr 2026

West Bengal Exit Poll 2026: Janmat Polls नुसार तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत

जनमत पोल्सचे अंदाज समोर आले असून त्यांनी टीएमसीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे दाखवले आहे.

तृणमूल काँग्रेस (TMC) : 195-205
भाजपा (BJP) : 80-90
काँग्रेस : 1-3
डावी आघाडी : 0-1
इतर : 3-5

20:33 (IST) 29 Apr 2026

Election Exit Poll 2026 Live Updates: लोकसभेप्रमाणे हे एक्झिट पोल्सही चुकीचे ठरतील - खासदार महुआ मोईत्रा

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एक्झिट पोल्सचे आकडे फेटाळून लावले आहेत. तीन एक्झिट पोल्सनी पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता येणार, असा अंदाज व्यक्त केला आहे. यावर त्यांनी एक्स पोस्ट शेअर करत म्हटले, "लोकसभेच्या मतदानानंतर काही एक्झिट पोल्सनी भाजपाला ३५०, ४००, ३६१-४०१ अशा जागा वाटल्या होत्या. पण निकालानंतर भाजपाला २४० जागा मिळाल्याचे स्पष्ट झाले. ४ मे रोजीही असेच काहिसे होईल."

https://twitter.com/MahuaMoitra/status/2049488519375233052

19:59 (IST) 29 Apr 2026

West Bengal Exit Poll 2026: Poll Diary च्या मते पश्चिम बंगालमध्ये भाजपाला आघाडी, पण तृणमूलही तुल्यबळ

तृणमूल – ९९ ते १२७

भाजपा – १४१ ते १७१

काँग्रेस – ३ ते ५

डावे – २ ते ३

इतर – ० ते १

19:56 (IST) 29 Apr 2026

West Bengal Exit Poll 2026: JVC च्या मते पश्चिम बंगालमध्ये भाजपाला आघाडी, पण तृणमूलही तुल्यबळ

तृणमूल – १३१ ते १५२

भाजपा –१३८ ते १५९

काँग्रेस – ० ते २

डावे – ०

इतर – ०

19:54 (IST) 29 Apr 2026

Puducherry Exit Poll 2026: पाँडिचेरीत भाजपाची जोरदार मुसंडी, Peoples Pulse च्या मते कमळ पुन्हा सत्तेत

भाजपा – १६ ते १९

काँग्रेस – १० ते १२

इतर – १ ते २

19:53 (IST) 29 Apr 2026

Puducherry Exit Poll 2026: पाँडिचेरीत भाजपाची जोरदार मुसंडी, Poll of Exit Polls च्या मते कमळ पुन्हा सत्तेत

भाजपा – १७

काँग्रेस – ९

इतर – ३

19:52 (IST) 29 Apr 2026

Assam Exit Poll 2026: आसाममध्ये पुन्हा कमळ, Pol Diary चा अंदाज काय सांगतो

भाजपा – ८६ ते १०१

काँग्रेस – १५ ते २६

इतर – ३ ते ७

19:50 (IST) 29 Apr 2026

Tamilnadu Exit Poll 2026: Axis My India च्या मते तामिळनाडूत विजय थलपतीच्या पक्षाची जोरदार मुसंडी

द्रमुक – ९२ ते ११०

अद्रमुक – २२ ते ३२

टीव्हीके – ९८ ते १२०

इतर –०

19:45 (IST) 29 Apr 2026

आसाममध्ये भाजपाची हॅटट्रीक, काँग्रेस पुन्हा अपयशी; पाहा Exit Poll चे आकडे

Assam Assembly Exit Poll Results 2026: ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये भाजपा 'हॅट्ट्रिक' साधणार की काँग्रेस विजयी होणार? याबद्दल उत्सुकता आहे. ...सविस्तर वाचा
19:45 (IST) 29 Apr 2026

पश्चिम बंगालमध्ये चार Exit Poll पैकी तीन जणांचे कल भाजपाकडे झुकले; ममता बॅनर्जींचा गड उद्ध्वस्त होणार?

West Bengal Exit Poll 2026 TMC vs BJP: पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले. बुधवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल्सचे अंदाज समोर येत आहेत. ...सविस्तर बातमी
19:14 (IST) 29 Apr 2026

Assam Exit Poll 2026: आसाममध्ये पुन्हा कमळ, JVC चा अंदाज काय सांगतो

भाजपा – ८८ ते १०१

काँग्रेस – २३ ते ३३

इतर – २ ते ५

19:13 (IST) 29 Apr 2026

Kerala Exit Poll 2026: केरळमध्ये P-Marq च्या मते दोन्ही आघाड्यांना तुल्यबळ जागा

एलडीएफ – ६२-६९

यूडीएफ – ७१-७९

भाजपा – १ ते ४

इतर – ० ते ३

19:05 (IST) 29 Apr 2026

Puducherry Exit Poll 2026: पाँडिचेरीत भाजपाची जोरदार मुसंडी, Axis My India च्या मते कमळ पुन्हा सत्तेत

भाजपा आघाडी - १६ ते २०

काँग्रेस आघाडी - ६ ते ८

इतर - ३ ते ७

19:04 (IST) 29 Apr 2026

Assam Exit Poll 2026: आसाममध्ये पुन्हा कमळ, Peoples Pulse चा अंदाज काय सांगतो

भाजपा – ६८ ते ७२

काँग्रेस – २२ ते २६

इतर – ११ ते १५

19:02 (IST) 29 Apr 2026

Kerala Exit Poll 2026: केरळमध्ये Axis My India च्या मते दोन्ही आघाड्यांना तुल्यबळ जागा

एलडीएफ – ४९-६२

यूडीएफ – ७८ ते ९०

भाजपा – ० ते ३

इतर – ०

18:57 (IST) 29 Apr 2026

Assam Exit Poll 2026: आसाममध्ये पुन्हा कमळ, Polls of Exit Polls चा अंदाज काय सांगतो

भाजपा – ९२

काँग्रेस – २९

इतर – ४

18:51 (IST) 29 Apr 2026

West Bengal Exit Poll 2026: Chanakya Strategies च्या मते पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला आघाडी, पण भाजपाची मुसंडी

तृणमूल – १३० ते १४०

भाजपा – १५० ते १६०

काँग्रेस – ०

डावे – ०

इतर – ६ ते १०

18:49 (IST) 29 Apr 2026

Kerala Exit Poll 2026: केरळमध्ये Peoples Pulse च्या मते दोन्ही आघाड्यांना तुल्यबळ जागा

एलडीएफ – ६० ते ६५

यूडीएफ – ७० ते ७५

भाजपा – ३ ते ५

इतर – ०

18:47 (IST) 29 Apr 2026

Tamilnadu Exit Poll 2026: Peoples Pulse च्या मते तामिळनाडूत द्रमुकलाच पुन्हा पसंती

द्रमुक – १२५ ते १४५

अद्रमुक – ६५ ते ८०

टीव्हीके – १८ ते २४

इतर – २ ते ६

18:45 (IST) 29 Apr 2026

West Bengal Exit Poll 2026: P-Marq च्या मते पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला आघाडी, पण भाजपाची मुसंडी

तृणमूल – ११८ ते १३८

भाजपा – १५० ते १७५

काँग्रेस – ०

डावे – ०

इतर – ०

18:44 (IST) 29 Apr 2026

West Bengal Exit Poll 2026: Matrize च्या मते पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला आघाडी, पण भाजपाची मुसंडी

तृणमूल –१२५ ते १४०

भाजपा – १४६ ते १६१

काँग्रेस – ०

डावे – ०

इतर – ६ ते १०

18:42 (IST) 29 Apr 2026

West Bengal Exit Poll 2026: Peoples Pulse च्या मते पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला आघाडी, पण भाजपाची मुसंडी

तृणमूल - ११७ ते १८७

भाजपा - ९५ ते ११०

काँग्रेस - १ ते ३

डावे - ० ते १

इतर - ०

18:41 (IST) 29 Apr 2026
Kerala Exit Poll 2026: केरळमध्ये Matrize च्या मते दोन्ही आघाड्यांना तुल्यबळ जागा

एलडीएफ - ६० ते ६५

यूडीएफ - ७५ ते ८५

भाजपा - ३ ते ५

इतर - ०

18:40 (IST) 29 Apr 2026

Tamilnadu Exit Poll 2026: Matrize च्या मते तामिळनाडूत द्रमुकलाच पुन्हा पसंती

द्रमुक - १२२ ते १३२

अद्रमुक - ८७ ते ११०

टीव्हीके - १० ते १२

इतर - ० ते ६

18:37 (IST) 29 Apr 2026

Assam Exit Poll 2026: आसाममध्ये पुन्हा कमळ, Matrize चा अंदाज काय सांगतो

भाजपा - ८५ ते ९५

काँग्रेस - २५ ते ३२

इतर - ६ ते १२

18:34 (IST) 29 Apr 2026

Assam Exit Poll 2026: आसाममध्ये पुन्हा कमळ

Axix My India च्या अंदाजानुसार भाजपाला आसाममध्ये ८८ ते १०० जागा मिळतील तर काँग्रेसला २४ ते ३६ जागा मिळतील

18:12 (IST) 29 Apr 2026
West Bengal Assembly Elections Numbers: आकड्यांमध्ये समजून घ्या पश्चिम बंगालची यंदाची निवडणूक

एकूण जागा - २९४

बहुमताचा आकडा - १४८

मतमोजणी - ४ मे

पक्षांनी लढवलेल्या जागा

तृणमूल काँग्रेस - २९१

भारतीय गोरखा प्रजातांत्रिक मोर्चा - ३

डावी आघाडी

माकप - १७०

काँग्रेस - २९३

आयएसएफ - ३०

ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक - २३

रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी - १६

सीपीआय - १७

इतर - १२

भाजपा - २९४

Election Exit Poll 2026 Live Updates Who Will Form Government : पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ व पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल