पीटीआय, नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. निवडणूक आयोगाने बुधवारी ही घोषणा केली. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीची अधिसूचना ५ जुलै रोजी काढली जाणार असून १९ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २० जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून, २२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ६ ऑगस्टला मतमोजणी होणार आहे.

लोकसभा व राज्यसभेचे सदस्य उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घेतात. या निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यही सहभागी होतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला.