ट्वीटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क यांच्याकडून रोज काही तरी नवीन नियम किंवा फीचर घोषीत करण्यात येत आहेत. अशात ट्वीटरकडून आणखी एक नवीन फीचर करण्यात आले आहे. एलॉन मस्क यांनी स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा – मस्क यांनी बंद केलेली पत्रकारांची ‘ट्विटर’ खाती पुन्हा सुरू

ट्विटरने जारी केलेल्या नव्या फीचरनुसार आता व्हिडीओप्रमाणेच तुमचे ट्वीट युजर्सने किती वेळा बघितले याची माहिती मिळणार आहे. हे नवं फीचर सुरु करण्याचे कारण देखील एलॉन मस्क यांनी सांगितले आहे. ”ट्विटवरील ९० टक्के युजर्स ट्वीट बघून स्कोल करतात. मात्र, त्या ट्वीटला लाईक किंवा रिट्वीट करत नाहीत. त्यामुळे हे ट्वीटरने हे नवीन आणण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे.

तत्पूर्वी, मस्क यांनी गुंतवणूकदार, व्यापारी, आर्थिक तज्ज्ञ आणि संस्थांसाठी गुरुवारी एक अनोखे फीचर सादर केले होते. या नवीन फीचरद्वारे युजरला ट्विटमध्ये क्रिप्टोकरन्सी, एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि प्रमुख स्टॉक्सचे चार्ट आणी आलेख पाहण्यास मदत होणार आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या स्टॉकच्या संक्षिप्त रुपला त्याच्या समोर ‘$’ हे चिन्ह लावून ट्विट कराल, तेव्हा ते स्टॉक आपोआप क्लिक करण्यासाठी उपलब्ध होईल आणि ते युजरला त्या स्टॉकबाबतच्या शोध परिणामांवर घेऊन जाईल जे किंमतीचा आलेख आणि त्याबद्दलचा इतर डेटा दर्शवेल.