scorecardresearch

‘पैसे द्या, ब्लू टिक घ्या’, एलॉन मस्कच्या योजनेचा फायदा घेतायत तालिबानी; कट्टरपंथीयांचे ट्विटर व्हेरिफाईड

ट्विटरच्या पेड ब्लू टिक योजनेचा तालिबानच्या कट्टरपंथीयांकडून वापर होत आहे.

‘पैसे द्या, ब्लू टिक घ्या’, एलॉन मस्कच्या योजनेचा फायदा घेतायत तालिबानी; कट्टरपंथीयांचे ट्विटर व्हेरिफाईड
तालिबानच्या नेत्यांना मिळतेय ट्विटरवर ब्लू टिक

ट्विटर कंपनी एलॉन मस्कने विकत घेतल्यापासून कंपनीच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटरचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे ब्लू टिक बॅच. अनेक राजकारणी, सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठित लोकांच्या अकाऊंटला ब्लू टिक मिळालेली आहे. अनेक युजर्सना ही ब्लू टिक हवीहवीशी वाटते. एलॉन मस्क यांनी नुकतीच ही ब्लू टिक विकत देण्यास सुरुवात केली आहे. यानंतर कुणीही पैसे देऊन ती विकत घेऊ शकतो. अर्थात भारतात अजूनही ही सेवा उपलब्ध झालेली नाही. पण अनेकजण आपल्या अकाऊंटचे लोकेशन बदलून ही सर्विस विकत घेत आहेत. पण बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार एक वेगळंच आक्रीत घडलं आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलसाठी ही ब्लू टिक विकत घेत आहेत.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटर पेड व्हेरिफिकेशन बॅजसाठी अनेक तालिबानी नेते अर्ज करत आहेत. याचा अर्थ नियमाप्रमाणे पैसे दिल्यानंतर त्यांच्या अकाऊंटला ब्लू टिक मिळेल. सध्या तालिबानचे दोन अधिकारी आणि अफगाणिस्तानमधील कट्टर इस्लामवादी समूहाच्या चार समर्थकांचे ट्विटर हँडल व्हेरिफाईड झाले आहे. त्यांना ब्लू टिक मिळाली आहे. तालिबानच्या एक्सेस टू इन्फॉर्मेशन विभागाचे प्रमूख हिदायतुल्लाह हिदायत यांचे अकाऊंट व्हेरिफाईड झाले आहे.

काय आहे ब्लू टिक योजना

ट्विटरचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी एलॉन मस्क अनेक नवनवीन योजना आणत आहे. तर ट्विटरच्या खर्चावर देखील नियंत्रण आणायचा त्याचा प्रयत्न आहे. यासाठी ट्विटरमधून मोठी कर्मचारी कपात देखील करण्यात आली आहे. आता ब्लू टिक फिचर विकत देण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. ब्लू टिक सोबत इतरही प्रिमियम फिचर्स यामध्ये युजर्सना मिळत आहेत. याआधी ब्लू टिक केवळ समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांना मिळत होती, त्यावरुन त्या त्या अकाऊंटची सत्यता कळून यायची. कुणीही पैसे देऊन ब्लू टिक विकत घेऊ शकत नव्हता. मात्र एलॉन मस्कच्या धोरणांमुळे आता कट्टरपंथीय देखील या योजनेचा लाभ घेतायत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 12:24 IST

संबंधित बातम्या