एलॉन मस्क यांचा गुगल, फेसबुकवर निशाणा; म्हणाले, “या बड्या टेक कंपन्यांमध्ये तरुणांची…”

एलॉन मस्क यांनी गुगल आणि फेसबुकसह बड्या टेक कंपन्यांवर टीका केली आहे.

elon musk new

एलॉन मस्क यांनी गुगल आणि फेसबुकसह बड्या टेक कंपन्यांवर टीका केली आहे. एका ट्विटला रिप्लाय करताना त्यांनी या टेक कंपन्यांवर निशाणा साधला. गुगल, फेसबुकसारख्या मोठ्या कंपन्या असं ठिकाण आहे, जिथे तरुणांची प्रतिभा मरते, असं वक्तव्य एलॉन मस्क यांनी केलंय. मस्क यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. जेडी रॉस नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने गुगलवर निशाणा साधत म्हटले होते की, “गूगलची सर्वात मोठी वाईट गोष्ट म्हणजे ते २२ वर्षांच्या  हुशार तरुणांना मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणारे महत्त्वाकांक्षी संस्थापक बनवण्याऐवजी करिअरिस्ट बनवतात.”

याच ट्विटला उत्तर देताना मस्क म्हणाले, “मोठ्या टेक कंपन्या अशा ठिकाणांमध्ये बदलल्या आहेत जिथे तरुणांची प्रतिभा मरते”. दरम्यान, त्यांच्या या ट्विटनंतर अनेक युजर्सनी त्यांना विचारले की “टेस्ला या कंपन्यांपेक्षा अशा कोणत्या वेगळ्या गोष्टी करत आहे, आणि तरुणांमधील प्रतिभा मरत नाही याची खात्री कशी करत आहे?”, असा सवाल केला. तर काही युजर्सनी गुगलची बाजू घेतली. एक युजर म्हणाला, “करियर करण्यासाठी आणि लवकर पैसे कमवण्यासाठी, आयुष्यात पुढे जाण्यासाठी गुगल हे एक उत्तम ठिकाण आहे.”

एलॉन मस्क यांनी गुगल, अमेझॉनसह इतर बड्या टेक कंपन्यांवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वी अनेक वेळा त्यांनी गुगल, फेसबुक आणि अमेझॉनवर निशाणा साधला आहे. अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्याविरोधात त्यांचे मत व्यक्त केले होते. तर मस्क यांनी अॅमेझॉनला एकदा कोरोना व्हायरस विषयीच्या पुस्तकाच्या प्रकाशनावर सेन्सॉर केल्याबद्दल लक्ष्य केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Elon musk slams google and facebook says these are places where talent goes to die hrc

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना