वृत्तसंस्था, सॅनफ्रान्सिस्को : टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी असलेल्या ट्विटरची १०० टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी गुरुवारी प्रस्ताव दिला आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ट्विटरचे १०० टक्के समभाग सुमारे ४३.३९ अब्ज डॉलरला रोखीत खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनतर ट्विटरमधील सर्वात मोठे भागधारक बनले आहेत. मात्र त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. ट्विटरच्या खरेदीसाठी हा सर्वोत्तम आणि शेवटचा प्रस्ताव असल्याचे मस्क यांनी सांगितले. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी दिलेल्या प्रस्तावानंतर ट्विटरच्या समभागाने ९ टक्क्यांची उसळी घेतली.

कार्यशील लोकशाहीसाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्य ही एक सामाजिक गरज आहे. मात्र कंपनीमध्ये गेल्या आठवडय़ात गुंतवणूक केल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या असून कंपनीमध्ये मोठे बदल होणे अत्यावश्यक आहे. याचबरोबर कंपनीची सध्याची कामाची पद्धत बदलण्याची गरज असून ती तशीच ठेवल्यास कंपनीची प्रगती होणे अशक्य आहे. कंपनीमध्ये प्रचंड क्षमता असून कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. मी दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास कंपनीत एक भागधारक म्हणून राहण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल, असे मस्क यांनी ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

समभागाची उसळी

मस्क यांनी ट्विटरला देऊ केलेल्या प्रस्तावाबद्दल म्हटले आहे की, ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ट्विटरचे १०० टक्के समभाग घेण्यास उत्सुक असून ही किंमत म्हणजे मी कंपनीत गुंतवणूक करण्याच्या आधी असलेल्या समभागाच्या किमतीपेक्षा ५४ टक्के अधिक अधिमूल्यासह आहे. तर ट्विटरमध्ये गुंतवणूक केल्यांनतर वाढलेल्या किमतीच्या ३८ टक्के अधिमूल्यासह आहे.

सर्वात मोठे भागधारक : मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ट्विटरचे १०० टक्के समभाग सुमारे ४३.३९ अब्ज डॉलरला रोखीत खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनतर ट्विटरमधील सर्वात मोठे भागधारक बनले आहेत.

भागधारक म्हणून पुनर्विचाराचा इशारा : कंपनीमध्ये प्रचंड क्षमता असून कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. मी दिलेल्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास कंपनीत एक भागधारक म्हणून राहण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल, असे मस्क यांनी ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.