इलॉन मस्क यांनी ट्विटरसाठी नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड केली असल्याची माहिती समोर आली आहे. मस्क यांनी निवड केलेली व्यक्ती ट्विटरची ४४ अब्ज डॉलरमध्ये विक्री पूर्ण झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवालची जागा घेणार आहे. मात्र मस्क यांनी त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मस्क यांनी गेल्या महिन्यात ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांना सांगितले की कंपनीच्या व्यवस्थापनावर त्यांचा अजिबात विश्वास नाही. सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशन मध्येही मस्क यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅक डॉर्सीच्या जागी पराग अग्रवाल यांची ट्विटरचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अग्रवाल यांना १२ महिन्यांआधीच काढून टाकले तर कंपनीला त्यांना ३८.७ अब्ज डॉलर (सुमारे २९६ कोटी रुपये) द्यावे लागतील. मात्र, कराराची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पराग अग्रवाल या पदावर राहतील.

Former RBI Governor D Subbarao
विकासाचे गुलाबी चित्र रंगवण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेवर यूपीए सरकारचा दबाव! सुब्बाराव यांचा मुखर्जी, चिदम्बरम यांच्यावर आरोप
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

इलॉन मस्क यांच्या अधिग्रहणाला कर्मचारी विरोध करत होते. कर्मचाऱ्यांचा रोष शांत करण्यासाठी पराग अग्रवाल यांनी बैठक घेतली होती. त्यांनी कर्मचार्‍यांना शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु कर्मचार्‍यांनी इलॉन मस्क यांनी काय योजना आखली आहे असा सवाल उपस्थित केला होता. यावेळी पराग अग्रवाल यांनी सांगितले की, “कंपनी दररोज कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवेल, पण मस्क यांच्याबरोबर खरेदी कराराचा कसा परिणाम होईल हे स्पष्ट करणे खूप घाईचे होईल.”

इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर MightyApp चे संस्थापक सुहेल यांनी ट्विट करत, ट्विटरचे विद्यमान सीईओ पराग अग्रवाल यांच्यासाठी मला खूप दुःख झाले आहे. त्याच्याकडे अनेक योजना होत्या. पण आता त्यांना आणि त्यांच्या टीमला अनिश्चिततेत जगावं लागणार आहे, असे म्हटले होते. या ट्विटला उत्तर देताना पराग यांनी आभार मानले होते.

यावर उत्तर देताना अग्रवाल यांनी ‘धन्यवाद, पण तुला माझ्याबद्दल असं वाटू नये. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेवा आहे आणि त्यामध्ये आपण सतत सुधारणा करत आहोत. मी हे काम केले जेणेकरून मी ट्विटर सुधारू शकेन आणि माझी सेवा आणखी मजबूत करू शकेन. मला माझ्या लोकांचा अभिमान आहे जे सततच्या गोंगाटात लक्ष देऊन काम करत आहेत, असे अग्रवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले.

मस्क यांनी ट्विटरच्या खरेदीच्या घोषणेनंतर भविष्यातील बदलांची देखील चर्चा केली आणि ते म्हणाले की ते ट्विटरवरून पैसे कमविण्याच्या नवीन मार्गावर काम करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की जे ट्विट खूप व्हायरल आहेत किंवा ज्यात विशिष्ट माहिती आहे, त्यावर कमाई करणार आहोत. तसेच, जो कोणी ट्विट एम्बेड किंवा कोट करेल, त्याचे शुल्क देखील घेतले जाणार आहे आणि कंपनीचा महसूल वाढवेल.