गुजरातमधील कांडला येथून उड्डाण घेऊन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाची बाहेरील विंडशील्डला तुटल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे मुंबईत या विमानाची इमर्जेन्सी लॅंडींग करण्यात आली. स्पाइसजेटच्या इमर्जेन्सी लॅंडींगची दिवसभरात घडलेली ही दुसरी घटना आहे. विमानातील सर्व प्रवाशी आणि कर्मचारी सुखरूप आहे.

स्पाइसजेटच्या विमानाबाबत घडलेली दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. तर गेल्या ३ आठवड्यात स्पाईसजेटच्या विमानामध्ये ७ वेळा बिघाड झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आज सकाळी दिल्ली ते दुबई जाणाऱ्या स्पाईट जेट विमानाची कराचीत इमर्जेन्सी लॅंडींग करण्यात आली होती. विमानात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही इमर्जेन्सी लॅंडींग करण्यात आली होती. या विमानात १५० पेक्षा जास्त प्रवाशी होते.

तर १९ जून रोजी दिल्लीला जाणार्‍या स्पाईसजेट विमानाने टेक ऑफनंतर लगेचच पाटणा येथे इमर्जेन्सी लँडिंग केले होते. पक्ष्याच्या धडकेमुळे इंजिनला आग लागल्याने हे इमर्जेन्सी लॅंडिंग करण्यात आले होते.