प्यूर्टो रिको येथे राहणाऱ्या व्यक्तीची जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे. एमिलियो फ्लोर्स मार्केझ असं त्यांच नाव आहे. सध्या त्यांच वय ११२ वर्ष ३२६ दिवस आहे. जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने बुधवारी याची घोषणा केली. मार्केझचा जन्म १९०८ मध्ये पोप्यूर्टो रिकान राजधानी कॅरोलिना येथे झाला होता.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर मार्केज एका मुलाखतीमध्ये म्हणाले, “माझ्या वडिलांनी मला प्रेमाने वाढवले ​​आणि प्रत्येकावर प्रेम करणे शिकवले. त्यांनी नेहमीच मला व माझ्या भावांना आणि बहिणींना चांगले कार्य करण्यास सांगितले होते, आणि असेही म्हटले होते की ‘मसीहा’  नेहमीच आपल्यात जीवंत असतो”

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
World Oldest Person from Venezuela Juan Vicente Pérez dies at aged 114 Ones Set Guinness World Records
रोज मद्य सेवन करणाऱ्या जगातील सर्वांत वृद्ध व्यक्तीचे निधन; ‘त्यांचे’ कुटुंब पाहिलेत का?

हेही वाचा- Viral Video : ठळक बातम्या वाचताना Live Telecast दरम्यान अँकरने केली पगाराची मागणी

आपल्या ११ भावंडांमधील दुसरा मोठा भाऊ आणि मार्केझने ऊस शेतात आपल्या कुटुंबासाठी काम केले आणि फक्त तीन वर्षे शाळेत शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांची पत्नी एंड्रिया प्रेज डी फ्लोर्स यांचा २०१० मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केझ पूर्वी  रोमेनियाच्या डुमित्रू कोमेनेस्कुने सर्वात वयस्कर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. परंतु २७ जून २०२० रोजी त्यांचे वयाच्या १११ वर्ष २१९ दिवसांनी निधन झाले. त्यानंतर मार्केझने हा नवीन विक्रम केला आहे.