पीटीआय, भुवनेश्वर

देशातील कच्च्या मालाची निर्यात होणे आपल्याला मान्य नाही, कच्च्या मालावर प्रक्रिया करून तयार मालाचीच निर्यात व्हायला हवी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. कच्च्या मालाचे भारतातच मूल्यवर्धन व्हायला हवे असे ते म्हणाले. भुवनेश्वरच्या जनता मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्कर्ष ओडिशा, मेक इन ओडिशा कॉनक्लेव्ह’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी बोलत होते.

पूर्व भारत देशाच्या प्रगतीचे इंजिन असून ओडिशा त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळेस स्पष्ट केले. ‘‘देशाच्या या भागात मोठ्या प्रमाणात खनिजांचे उत्खनन केले जाते आणि ते इतर देशांना निर्यात केले जाते. तिथे त्याचे मूल्यवर्धन होते आणि भारताला तयार माल पाठवला जातो. मला हे मान्य नाही,’’ असे ते म्हणाले. बदलत्या जगामध्ये जागतिक पुरवठा साखळीसमोरील आव्हाने ओळखण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

कच्च्या मालाची निर्यात करून देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे आम्ही संपूर्ण व्यवस्थाच बदलत आहोत आणि एका नव्या दृष्टिकोनाने काम करत आहोत. जागतिक चढउतारांचा परिणाम कमी करण्यासाठी भारतातच मजबूत पुरवठा व मूल्य साखळी निर्माण करायला हवी. ही जबाबदारी सरकार आणि उद्याोग या दोघांचीही आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Story img Loader