Hardeep Puri Answer to Rahul Gandhi : केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. एपस्टीन फाइल्सवरुन राहुल गांधींनी जे आरोप माझ्यावर केले आहेत त्यांना काहीही अर्थ नाही ते सगळे आरोप बिनबुडाचे आहेत असं हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे हरदीप पुरींनी?
त्यांना (राहुल गांधी) बिनबुडाचे आरोप करायची सवयच आहे. दोन प्रकारचे नेते असतात. काही नेते राजकीय यंत्रणेची जबाबदारी घेतात आणि आपलं आयुष्य लोकांच्या सेवेसाठी घालवतात, देश बदलण्याची ताकद अशा नेत्यांमध्ये असते. हे अशा प्रकारचे नेते असतात ज्यांनी ठरवलेलं असतं की देशातल्या १० सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जगांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कशी असेल.सध्या आपण चौथ्या क्रमांकावर आहोत लवकरच आपण जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश असणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे नेते असतात जे कधी कधी देशात येतात. कधी कधी परदेशात फिरतात. जेव्हा असे नेते संसदेत येतात तेव्हा महत्त्वाचा काही मुद्दा असेल तर ते वॉक आऊट करतात. तुम्हाला समजलंच असेल मी कुणाबद्दल बोलतोय असं म्हणत त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला.
माझ्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे-पुरी
एपस्टीनसह झालेल्या चर्चेबाबत आणि आरोपांबाबत विचारलं असता हरदीप सिंह म्हणाले आमची जी चर्चा झाली आणि जे काही आरोप त्याच्यावर होत आहेत त्या दोहोंचा काहीही संबंध नाही. आम्ही मेक इन इंडिया बाबत चर्चा केली होती. माझ्यावर जे आरोप लावण्यात आलेत त्या आरोपांना काहीही अर्थ नाही. एपस्टीन काय करतो, त्याच्याशी मला काहीही घेणंदेणं नव्हतो. एपस्टीन मला दुतोंडी माणूस असं म्हणाला होता. राहुल गांधींनी आरोप करण्याआधी तो ईमेल वाचला पाहिजे त्यांना समजू शकेल की करत असलेले आऱोप बिनबुडाचे आहेत.
एपस्टीन फाइल्स जानेवारी महिन्यात उघड
जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टीन फाइल्स संदर्भात अनेक कागदपत्रं समोर आणली होती. हे प्रकरण कायद्याने पुन्हा सुरु व्हावं या उद्देशाने ही कागदपत्रं समोर आणण्यात आली आहेत. मुलींचं आणि तरुणींचं शोषण करण्यात आलं होतं यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींची नावं आली होती. दरम्यान राहुल गांधी यांनी जे आरोप केले होते. त्या आऱोपांना हरदीप पुरी यांनी उत्तर दिलं आहे आणि राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे आहेत असं म्हटलं आहे.
