scorecardresearch

केअरटेकरचा जीव घेऊन ‘ती’ पळाली आपल्या जोडीदारासोबत; पण ‘ती’ मुलगी नसून चक्क सिंहीण आहे, जाणून घ्या प्रकरण…

इराणमध्ये अशा घटना घडणं काही नवी गोष्ट नाही. बऱ्याचदा अशा घटनांसाठी इराणमधली अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि निष्क्रिय, दुर्लक्षित आपत्कालीन विभाग याला जबाबदार धरलं जातं.

एका प्राणीसंग्रहालयात एका सिंहिणीचं जेवण सुरू होतं. तिचा केअर टेकर तिला जेवण देत होता. तेवढ्यात या सिंहीणीने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केलं आणि आपल्या जोडीदार सिंहाबरोबर ती चक्क पळून गेली. त्यानंतर ती कित्येक तास या प्राणीसंग्रहालयामध्ये खुलेआम फिरत होती.

ही घटना घडलीये इराणमधल्या एका प्राणीसंग्रहालयात. या प्राणीसंग्रहालयातला केअरटेकर सिंहिणीला जेवण देण्यासाठी तिच्या पिंजऱ्याच्या जवळ गेला. त्यादरम्यान ही सिंहीण आणि तिचा जोडीदार सिंह यांनी त्यांच्यावर हल्ला करत पिंजऱ्यातून पळ काढला. या हल्ल्यात तो केअर टेकर मात्र मारला गेला. त्यानंतर काही तासांनी पोलिसांनी आणि प्राणीसंग्रहालयातल्या सुरक्षारक्षकांनी तेहरानपासून २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अरक शहराच्या परिसरातून या दोघांनाही पकडलं.

या प्रकरणाचा अधिक तपास प्रशासन करत आहे. इराणमध्ये अशा घटना घडणं काही नवी गोष्ट नाही. बऱ्याचदा अशा घटनांसाठी इराणमधली अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि निष्क्रिय, दुर्लक्षित आपत्कालीन विभाग याला जबाबदार धरलं जातं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Escaped lioness kills keeper in iran prowls zoo for hours vsk

ताज्या बातम्या