…तर युरोप करोना संसर्गाचे केंद्र ठरेल!; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

युरोपमधील देशांकडे पुरेसा लशींचा साठा आहे. मात्र म्हणावे तसे लसीकरण झालेले नाही.

करोना संसर्गाबाबत युरोप हे पुन्हा एकदा जगाचे मुख्य केंद्र होऊ शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे युरोपचे विभागीय संचालक डॉ. हांस क्लाज यांनी दिला आहे.

युरोपमधील ५३ देशांत गेल्या एक महिन्याचा आढावा घेतला तर करोना संसर्गाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर पुन्हा गेल्यावर्षीप्रमाणे करोना संसर्गाची स्थिती ही युरोपमध्ये निर्माण होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

युरोपमधील देशांकडे पुरेसा लशींचा साठा आहे. मात्र म्हणावे तसे लसीकरण झालेले नाही. उलट काही देशात ४० टक्केही लसीकरण झाले नाही. असे असताना विकसनशील देशांना लस पाठवल्या जात आहेत. तेव्हा उपलब्ध लसींद्वारे देशातील नागरिकांचे लसीकरण करावे, नाहीतर फेब्रुवारीपर्यंत परिस्थिती चिघळेल असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे.

करोनाची लस उपलब्ध झाल्यावर नियम पाळण्यात लोकांमध्ये बेफिकीरपणा आलेला आहे. करोनाच्या नियमित चाचण्या करणे, करोनाबाधित व्यक्तीशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, घरात वायुविजन व्यवस्था योग्य ठेवणे हे करणे आवश्यक आहे. विशेषत: हिवाळा सुरू होत असल्याचा पार्श्वभूमीवर सतर्क रहाणे आवश्यक असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Europe will be the center of corona infection world health organization warning akp

ताज्या बातम्या