दिल्लीचं टेन्शन वाढलं; चाचणी झालेल्या चार व्यक्तींमागे एकाचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह

सर्वात कमी चाचण्यांचं होणाऱ्या जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्हीटी रेट

(संग्रहित छायाचित्र)

मागील एका आठवड्यापासून दिल्लीतील करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. दिल्लीत चाचणी करण्यात येणाऱ्या प्रत्येकी चारपैकी एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे पॉजिटिव्ह निघणाऱ्या रुग्णांची टक्केवारीही वाढली आहे. लॉकडाउन शिथिल केल्यामुळे करोनाचा संसर्ग वाढल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

दिल्लीतील ईशान्य दिल्ली, दक्षिण पूर्व दिल्ली या जिल्ह्यांमध्ये अपेक्षेपेक्षा खूप कमी चाचण्या करण्यात आल्या. मात्र, या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटीचे प्रमाण खूप जास्त आहे. हे प्रमाण ३८ टक्क्यांपेक्षाही जास्त असून, प्रत्येक पाच व्यक्तींपैकी दोन जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राजधानी दिल्लीतील सर्वच ११ जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रसार झालेला असून, दक्षिण पूर्व जिल्ह्यात पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण जास्त आहे. दक्षिण पूर्व दिल्लीत ३८.८ टक्के, ईशान्य दिल्लीत ३८.६ टक्के, पश्चिम दिल्लीत ३८ टक्के, उत्तर पश्चिम दिल्लीत ३६.७ टक्के आणि पूर्व दिल्लीत ३४ टक्के असं पॉझिटिव्हीटी प्रमाण आहे.

सर्वात कमी चाचण्यांचं होणाऱ्या जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्हीटी रेट

दिल्लीत दोन जिल्ह्यांमध्ये करोना चाचण्यांचं प्रमाण सर्वात कमी आहे. ईशान्य दिल्ली, दक्षिण पूर्व दिल्ली, असे हे जिल्हे आहेत. मात्र, त्याच ठिकाणी पॉझिटिव्ह निघणाऱ्या रुग्णांचं प्रमाण सर्वाधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत या विषयावर चर्चा केली होती. सध्या दिल्लीत २३ हजार ५०० रुग्ण आहेत. त्यातील १० हजार २२८ रुग्ण म्हणजे ४३.३४ टक्के रुग्ण हे मागच्या १० दिवसात आढळून आले आहेत. २८ मे रोजी दिल्लीत ५ हजार ९८८ रुग्णांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी १ हजार २४ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या ५ हजार २७२ नमुन्यांपैकी १ हजार १०५ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. १,२ व ३ जून रोजी अनुक्रमे ९९०, १ हजार २९८ व १ हजार ५१३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Every fourth sample positive in delhi bmh

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य