पेट्रोलियम पदार्थावरील अबकारी करामध्ये वाढीची शक्यता कमी

येत्या काही महिन्यांमध्ये जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सादर केलेल्या शिफारशी केंद्र सरकारने स्वीकारल्यास पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये तात्काळ वाढ होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येत्या काही महिन्यांमध्ये जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वाढलेल्या किमतीचा भार ग्राहकांवर पडू शकतो. गेल्या महिन्यात अरविंद सुब्रमण्यम यांनी तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याबाबतचा आपला अहवाल केंद्रीय अर्थ मंत्रालयाला सादर केला आहे. सध्या बॅरलमागे ४९ डॉलर इतका असलेला क्रूड ऑईलचा दर जोवर सरासरी ६५ डॉलपर्यंत पोहोचत नाही, तोवर त्यावर अबकारी कर ‘जैसे थे’ ठेवण्यात यावा अशी शिफारस सुब्रमण्यम यांनी केली आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Excise tax on petroleum materials

ताज्या बातम्या