World Economic Forum: सध्या स्वित्झर्लंडमधील डाव्होसमध्ये जगभरातले राजकारणी, उद्योगपती, सेलीब्रिटीज व विविध संस्थांचे प्रमुख यांची मांदियाळी भरली आहे. कारण आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं पाच दिवसीय वार्षिक अधिवेशन. या वार्षिक मेळ्यामुळे डाव्होसमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे निरीक्षण न्यू यॉर्क पोस्ट, ग्रीक रीपोर्टर, डेली मेलसारख्या न्यूज वेबसाईट्सनी नोंदवले आहे.

न्यू यॉर्क पोस्टनं म्हटलं आहे की, डाव्होसमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांचं मोठ्या प्रमाणात आगमन झालं असून, अतिश्रीमंतांना ‘खास’ सेवा देत पैसे कमावण्याची संधी त्या साधत आहेत. पत्रकारांनी या व्यवसायातील काही महिलांशी संपर्क साधला असता, एका रात्रीसाठी अडीच हजार डॉलर्स इतका दर या महिला आकारत असल्याचे समोर आले आहे. १६ ते २० जानेवारी या कालावधीत ही वार्षिक परिषद भरली असून जगभरातून हजारांच्या संख्येनं बडे नेते व उद्योजक डाव्होसमध्ये आले आहेत.

indian man killed in canada
कॅनडामध्ये भारतीय तरुणाची हत्या? कारमध्ये आढळला मृतदेह, पोलीस म्हणाले…
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?

पहिली बाजू: गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य

उच्चपदस्थांसोबतच कर्मचाऱ्यांचीही ‘सोय’!

बिल्ड या जर्मनीतल्या वृत्तपत्राने लियाना नाव धारण केलेल्या वेश्येचा दाखला देत वेश्यांची मागणी व भाव प्रचंड वाढल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अतिश्रीमंतांच्या गराड्यात त्यांच्या तोलामोलाचं वाटण्यासाठी उंची कपडे व आभूषणं परिधान करत, या गर्दीत आपण सामील झाल्याचं लिआनानं म्हटलं आहे. डाव्होसपासून १०० मैलांवर असलेल्या अरगाऊ या स्वित्झर्लंडमधील शहरात एक एस्कॉर्ट सर्विस चालवली जाते. ही सेवा पुरवणाऱ्या महिलेनं सांगितलं की पहिल्याच दिवशी ११ जणांचं बुकिंग झालंय, २५ जणांनी चौकशी केलीय आणि ही तर आताशा सुरुवात आहे. एका मॅनेजरच्या सांगण्यानुसार काही कंपन्यांच्या उच्चपदस्थांनी तर स्वत:बरोबरच आपल्या कर्मचाऱ्यांसाठीही हॉटेलमध्ये पार्टीची व एस्कॉर्ट्सची सोय करून ठेवली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधल्या अधिकृत आर्थिक कामांबरोबरच ‘जीवाचं डाव्होस’ करण्यासाठी लागणारी तजवीज अतिश्रीमंत करत असल्याचं बघायला मिळत आहे.

जर्मनीमधल्या एका वेश्येनं तर डाव्होसमधल्या अतिश्रीमंतांच्या मांदियाळीतला आपला अनुभव ट्विटरच्या माध्यमातून शेअर केल्याचं डेलीमेलनं म्हटलं आहे. अर्थात, या महिला आपल्या ग्राहकांची नावं उघड करत नाहीत. त्यामुळे बदनामीचा आरोप होत, कायद्याचं लचांड मागे लागेल अशी सार्थ भीती आहे. त्यामुळे जगभरातून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं डाव्होसमध्ये आलेले अतिश्रीमंत आर्थिक उन्नतीबरोबरच ऐहिक सुखोपभोगातही दंग झाले असले तरी ते जगजाहीर होण्याची शक्यता कमी असल्याने निर्धास्त आहेत.

काही वेश्यांनी तर जगातल्या विविध देशांतले आपले नेहमीचे ठरलेले ग्राहक असल्याचे सांगितले. जेव्हा जेव्हा हे ग्राहक स्वित्झर्लंडमध्ये येतात तेव्हा आपल्याला बोलावत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

डाव्होस परिषदेतील गुंतवणुकीवरून वाद : राज्यातील कंपन्यांशीच करार केल्याचा विरोधकांचा आरोप

स्वित्झर्लंडमध्ये एस्कॉर्ट सेवा कायदेशीर

स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वात जुना व्यवसाय मानला गेलेला वेश्याव्यवसाय कायदेशीर असल्यामुळे एस्कॉर्ट सर्विस अधिकृतपणे सेवा पुरवतात. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा जगाच्या आर्थिक किंवा एकूणच कल्याणासाठी किती उपयोग होतो यावर मतमतांतरे असली तर यात सहभागी होणाऱ्या अनेक अतिश्रीमंतांची डाव्होस वारी मात्र ऐहिक कल्याणाच्या स्तरावर सफल संपूर्ण झाली असेल असं म्हणायला हरकत नसावी!