Premium

Exit Polls 2023 Result Live Updates: तेलंगणात काँग्रेस बाजी मारणार? बीआरएसला धोबीपछाड?

Exit Polls 2023 Result Live Updates: तेलंगणाविषयी कुठले पोल काय अंदाज वर्तवत आहेत? वाचा सविस्तर बातमी

5 State Election Exit Polls 2023 Result Live Updates in Marathi
विधानसभा निवडणूक एक्झिट पोल २०२३ निकाल लाइव्ह (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

Vidhan Sabha Election Exit Polls 2023 Result Update: पाच राज्यांच्या निवडणुकांसाठीचं मतदान पार पडलं आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तेलंगणात ११९ जागांसाठी मतदान पार पडलं आहे. ६० जागा मिळवणारा पक्ष सत्ता स्थापन करुर शकणार आहे. भाजपा, काँग्रेस आणि BRS अशी तिरंगी लढत या ठिकाणी पार पडली आहे. या लढतीत कुणाचा विजय होणार हे ३ डिसेंबर रोजी स्पष्ट होईलच. मात्र आता एग्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया टीव्ही सीएनक्सच्या एग्झिट पोलचा अंदाज सांगतो आहे की बीआरएसला ३१ ते ४७ जागा मिळतील. तर काँग्रेसला ६३ ते ७९ जागा मिळतील. भाजपाला २ ते ४ जागा मिळतील. तर एमआयएमला ५ ते ७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच काँग्रेसला तेलंगणात स्पष्ट बहुमत मिळणार हा अंदाज या पोलने वर्तवला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Exit polls 2023 result live updates assembly election 2023 rajasthan madhya pradesh chhattisgarh telangana mizoram scj

First published on: 30-11-2023 at 20:31 IST
Next Story
Madhya Pradesh Exit Poll : काँग्रेस भाजपाला धक्का देणार? तीन एग्झिट पोल कमलनाथ यांच्या बाजूने