scorecardresearch

बांगलादेश: सात मजली इमारतीत भीषण स्फोट; १४ लोकांचा जागीच मृत्यू, १०० जण जखमी

बांगलादेशची राजधानी ढाका येथील गुलिस्तान भागात एका बहुमजली इमारतीत स्फोट घडला आहे.

explosion in building
फोटो- screengrab/india today

बांगलादेशची राजधानी ढाका येथील गुलिस्तान भागात एका बहुमजली इमारतीत स्फोट घडल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जवळपास १०० नागरिक जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून जखमी लोकांना ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती स्थानिक अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, ज्या इमारतीमध्ये स्फोट घडला आहे, ती इमारत ढाका येथील सिद्दीक बझारमध्ये स्थित आहे. या इमारतीत अनेक कार्यालये आणि दुकानं आहेत. घटनेच्या दिवशी मंगळवारी चारच्या सुमारास या सात मजली इमारतीच्या तळ मजल्यावर असणाऱ्या सॅनिटाइझ वस्तुंच्या दुकानात हा स्फोट घडला. या स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 20:03 IST