न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरजवळ शक्तीशाली स्फोट

दहशतवादी हल्ला आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही

फोटो सौजन्य-एएनआय
न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरजवळ एक शक्तीशाली स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे. मॅनहॅटन येथील एका बस स्टँडवर हा स्फोट झाला आहे. हा दहशतवादी हल्ला आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचेही वृत्त आहे.

जिथे स्फोट झाला त्या ठिकाणचा एक व्हिडिओही एएनआयने ट्विट केला आहे. हा दहशतवादी हल्ला आहे का? याचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. पोलिसांनी या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे. तसेच हा सगळा परिसर रिकामाही केला जातो आहे.

मॅनहॅटनच्या ४२ स्ट्रीट जवळ हा स्फोट झाल्याची माहितीही मिळते आहे. या परिसरात जे लोक आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. बस टर्मिनलच्या जमिनीखाली पाईपमध्ये बॉम्ब लपवला गेल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. स्फोटाचा मोठा आवाज होताच अनेक लोकांनी सैरावैरा पळायला सुरुवात केली. काही लोक सब वेमध्ये अडकले होते त्यांनाही सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Explosion reported near new yorks port authority bus terminal

ताज्या बातम्या