सेक्स रॅकेट चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले मेघालय भाजपाचे उपाध्यक्ष बर्नार्ड एन मारक यांच्या फार्महाऊसमधून पोलिसांनी स्फोटक साहित्य आणि शस्त्रे जप्त केली आहे. यामध्ये ३५ जिलेटिन कांड्या आणि १०० डिटोनेटर्सचादेखील समावेश आहे. मारक यांच्या तुरा येथील फार्महाऊसवर पोलिसांनी ही कारवाई केली.

मारक यांच्या तुरा येथील फार्महाऊसवरून सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी २२ जुलैरोजी याठिकाणी छापा टाकला होता. यावेळी ७३ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये ६ अल्पवयीनांचादेखील समावेश होता.

हेही वाचा – ‘महाराष्ट्रात कशाला जन्म घेतलात’ विचारणाऱ्या उद्धव ठाकरेंना शहाजीबापू पाटलांचं उत्तर; म्हणाले “रागीट आणि चिडखोर स्वभावामुळे….”

पोलिसांनी सर्व अल्पवयीनांना वैद्यकीय तपाणीसाठी नेल्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, पोलिसांनी बर्नार्ड एन मारक यांच्याविरोधात स्फोटक पदार्थ कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना अटकही करण्यात आली आहे. मारक यांच्यावर यापूर्वी आयपीसी आणि अनैतिक तस्करी (प्रतिबंध) कायदा, १९५६ यासह एकूण २५ गुन्हे दाखल आहेत.