डिसेंबर २०२२ पर्यंत वर्क फ्रॉम होम द्या; या राज्याची IT कंपन्यांना विनंती, करोना नाही तर हे आहे कारण…

आयटी कंपन्यांनी (IT Companies) डिसेंबर २०२२ पर्यंत म्हणजेच आणखी वर्षभर आपल्या कर्मचाऱ्यांना घरातच काम करण्यास सांगावं असं आवाहन ‘या’ राज्य सरकारने केलं आहे.

Extend work from home deadline December 2022 state government request to IT companies gst 97
या राज्य सरकारकडून IT कंपन्यांना आणखी वर्षभरासाठी वर्क फ्रॉम होम वाढवण्याची विनंती करण्यात आली आहे. (फोटो : प्रातिनिधिक)

कर्नाटक सरकारने राज्यातील आयटी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०२२ पर्यंत घरातूनच काम करण्याची अर्थात वर्क फ्रॉम होम (Work From Home) करण्याची परवानगी देण्याचं आवाहन केलं आहे. पण ह्यामागे करोना हे कारण नाही. तर, बेंगळुरू मेट्रोच्या बांधकामामुळे आऊटर रिंग रोडवर मोठ्या प्रमाणात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सरकारकडून ही विनंती करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने मंगळवारी (२४ ऑगस्ट) आयटी कंपन्यांनी (IT Companies) डिसेंबर २०२२ पर्यंत म्हणजेच आणखी वर्षभर आपल्या कर्मचाऱ्यांना घरातच काम करण्यास सांगावं असं सुचवलं आहे.

…म्हणून WFH चं आवाहन

इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीजला (NASSCOM) लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “BMRCL सेंट्रल सिल्क बोर्ड ते KR पुरमपर्यंतच्या आउटर रिंग रोडवर (ORR) मेट्रोचं बांधकाम सुरु करत आहे. हे मेट्रोचं काम पुढील सुमारे दीड ते दोन वर्षांपर्यंत चालू शकतं. तर ओआरआरमध्ये अनेक मोठी टेक पार्क आणि IT कंपन्यांची कॅम्पस आहेत. त्यामुळे, इथे दिवसभरात मोठ्या प्रमाणात रहदारी असते. सहा लेन आणि सर्व्हिस रोड असून सुद्धा ORR येथील बारमाही होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे.”

IT कंपन्यांची कार्यालय पुन्हा सुरु केली तर….

कर्नाटक सरकारने यावेळी ही गोष्ट विषत्वाने निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे कि, करोना महामारीदरम्यान आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिल्याने (डब्ल्यूएफएच) ओआरआरवरील वाहतूक कोंडीपासून थोडा दिलासा मिळाला होता. दरम्यान, आता ओआरआरवर (ORR) मेट्रोचं बांधकाम सुरू झाल्यावर आणि विशेषतः आयटी कंपन्यांची कार्यालय पुन्हा सुरु केली तर येथील वाहतुकीचं व्यवस्थापन करणं अत्यंत कठीण होऊ शकतं.

कर्नाटक सरकारने याच संभाव्य स्थितीचा विचार करून आयटी कर्मचाऱ्यांना मेट्रोचं काम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच डिसेंबर २०२२ पर्यंत वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरु ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Extend work from home deadline december 2022 state government request to it companies gst

ताज्या बातम्या