अमेरिका-कॅनडाच्या सीमेवर एका चिमुकल्यासह ४ भारतीयांचा मृत्यू झाला. कॅनडातून अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करताना ही घटना घडल्याचा संशय आहे. यावर आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. ही घटना ऐकून धक्का बसला आहे, अशी भावना जयशंकर यांनी व्यक्त केली.

जयशंकर यांनी ट्वीट करत म्हटलं, “कॅनडा-अमेरिका सीमेवर एका चिमुरड्यासह ४ भारतीयांच्या मृत्यूचं वृत्त ऐकून धक्का बसला. मी अमेरिका आणि कॅनडातील भारतीय राजदुतांना तात्काळ या परिस्थितीवर हालचाली करण्याचे निर्देश दिले आहेत.”

Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”
baltimore
US Bridge Collapse: धोक्याची सूचना देणाऱ्या भारतीय खलाशांचे जो बायडेन यांनी मानले आभार
Arvind Kejriwal arrest was also noticed by important international media
अटकेची आंतरराष्ट्रीय माध्यमांकडूनही दखल
Koo App
External Affairs Minister S. Jaishankar instructed Indian envoys to Canada and the US, Ajay Bisaria and Taranjit Singh Sandhu, ”to urgently respond to the situation” where four Indian nationals including an infant have lost their lives of the US-Canada border.
View attached media content
– IANS (@IANS) 21 Jan 2022

हेही वाचा : अमेरिका-कॅनडा सीमेवर थंडीमुळे ४ भारतीयांचा मृत्यू, मानवी तस्करीशी संबंधित असल्याचा संशय

नेमकं काय घडलं?

अमेरिकेच्या लगत असलेल्या कॅनडाच्या सीमेवर झालेल्या एका अपघातात एकाच परिवारातल्या चार सदस्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. हे चौघेही भारतीय नागरिक आहेत. मृतांमध्ये एका नवजात शिशूचाही समावेश आहे. या प्रकरणाचा संबंध मानवी तस्करीशी जोडला जात आहे.

मॅनटोबा रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी गुरुवारी सांगितलं की एमर्सन परिसराजवळ कॅनडा-अमेरिका सीमेवर कॅनडाजवळ बुधवारी चार मृतदेह सापडले आहेत, ज्यात दोन मृतदेह प्रौढ व्यक्तींचे असून एक किशोरवयीन व्यक्तीचा आणि एक नवजात शिशूचा आहे. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मृत्यू झालेल्या व्यक्ती भारतातून आले होते आणि कॅनडामधून अमेरिकेच्या सीमेतून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. सहायक पोलीस आयुक्त जेन मैक्लेची यांनी गुरुवारी सांगितलं, मी आज जी माहिती देणार आहे ती अनेकांना ऐकवणार नाही. ही एक खूप दुःखद घटना आहे. प्राथमिक तपासानुसार, असं वाटत आहे की या सर्वांचा मृत्यू गारठल्याने झालेला आहे.

मैक्लेची यांनी सांगितलं की, पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, हे चौघेही सीमेजवळच्या अमेरिकेच्या भागातून पकडण्यात आलेल्या एक गटातले होते. चारही मृतदेह सीमेपासून ९ ते १२ मीटरच्या अंतरावर आढळून आले आहे. अमेरिकी सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एमर्सन परिसरातून एक गट सीमा ओलांडून अमेरिकेत दाखल झाला आहे. एका प्रौढ व्यक्तीकडे लहान मुलाच्या काही वस्तू आहेत, मात्र या गटात कोणताही नवजात शिशू नाही.

यानंतर लगेचच सीमेच्या दोन्ही बाजूंना सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि दुपारी दोन प्रौढ व्यक्ती आणि एका नवजात शिशूचा मृतदेह आढळून आला. किशोरवयीन व्यक्तीचा मृतदेह मात्र काही वेळानंतर आढळला आहे. मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्लोरिडाच्या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे लोक कोणाच्या तरी मदतीने सीमेच्या पलिकडे जाण्याच्या विचारात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचा मृत्यू झाला. या परिसरात वारे वेगानं वाहत असून तापमान उणे ३५ अंश सेल्सियसच्या आसपास आहे. फक्त थंडीच नव्हे तर बराच काळ बर्फाळ हवा आणि अंधार यामुळेही त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.