परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत रशिया आणि चीनवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याचा अमेरिका आणि भारताचा प्रस्ताव चीनने संयुक्त राष्ट्र परिषदेत रोखला होता. या भूमिकेवर जयशंकर यांनी चीनची कानउघाडणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनकडून पुन्हा दहशतवाद्यांची पाठराखण, मुंबई हल्ल्याचा सुत्रधार साजिद मीरला काळ्या यादीत टाकण्यास दर्शवला विरोध

“शांतता आणि न्याय मिळवण्यासाठीचा लढा अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरक्षा परिषदेने यावर स्पष्ट संदेश दिला पाहिजे. राजकारण्यांनी याबाबत जबाबदारी न टाळता दंडमुक्तीला सुलभ करु नये. जगातील दहशतवाद्यांच्या यादीच्या मंजुरीबाबत या परिषदेत घेण्यात आलेली भूमिका खेदजनक आहे. दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत शिक्षा न मिळाल्यास दंडमुक्तीबाबत परिषदेतून मिळत असलेल्या संकेतांवर विचार व्हायला हवा”, असे जयशंकर चीनला उद्देशून म्हणाले आहेत. दहशतवाद्यांविरोधातील कारवायांमध्ये सातत्य राखणे गरजेचे असल्याचेही जयशंकर यांनी म्हटले आहे.

“पंतप्रधान मोदींनी रात्री साडेबाराला फोन केला नी विचारलं…”; परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितली अफगाणिस्तान युद्धाच्या वेळीची आठवण

दरम्यान, या परिषदेत रशिया-युक्रेनमधील युद्धावरदेखील जयशंकर यांनी भाष्य केले आहे. “संघर्षाच्या परिस्थितीतही आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये. अशाप्रकारच्या घटना घडत असल्यास वस्तुनिष्ठ आणि स्वतंत्रपणे तपास होणे आवश्यक आहे. बुकामध्ये झालेल्या हत्याकांडाबाबत भारताने घेतलेली भूमिका आजही कायम आहे”, असे या परिषदेत जयशंकर म्हणाले आहेत. बुका हत्याकांडाच्या स्वतंत्र तपासाच्या मागणीला भारताने समर्थन दिले होते, अशी आठवणही परिषदेला जयशंकर यांनी करुन दिली. युक्रेममधील संघर्ष थांबवणे काळाची गरज असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. पुतीन यांचा आण्विक हल्ल्याबाबतचा इशारा चिंता वाढवणारी बाब असल्याचे जयशंकर म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: External minister s jaishankar hit out china and russia in security council of united nations rvs
First published on: 23-09-2022 at 11:54 IST