FB बुलेटीन: घुसखोरांवर कारवाईची हिंमत मोदी सरकारनेच दाखवली या बातमीसह अन्य महत्त्वाच्या बातम्या

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा

आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाची बातमी आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासंदर्भातील. घुसखोरांवर कारवाई करण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवली आहे असा दावा त्यांनी केला. काँग्रेसने हे काम केले नाही त्यामुळे याचे श्रेय मोदी सरकारलाच मिळायला हवे असेही ते म्हणाले. याबरोबरच पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली आहेत. काही दिवसांतच म्हणजे ११ ऑगस्ट रोजी शपथविधी होईल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बोलविण्यात देण्यात येणार आहे. आता मोदी हे आमंत्रण स्विकारतील का हा प्रश्न आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमके काय निकष असावेत याबाबत अभ्यास सुरु आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Facebook bulletin 31st july