फेसबुकचे नाव बदलण्याचे संकेत

दूरस्थ भागात आरोग्य तंत्रज्ञान पोहोचवण्याचेही उद्देश त्यात होते.

facebook
फेसबुक

फेसबुक ही समाजमाध्यम कंपनी पुढील आठवड्यात नावात बदल करणार असल्याचे वृत्त ‘दी व्हर्ज’ या नियतकालिकाने दिले असून त्यात थेट सूत्रांचा हवाला देण्यात आला आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी २८ ऑक्टोबरला होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक बैठकीत नवीन नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, फेसबुकने ही अफवा आहे की, अंदाज यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. व्यावसायिक कामकाजाबाबत अमेरिकी सरकारकडून कंपनीची छाननी चालू असताना नाव बदलण्याचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकेतील दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी कंपनीच्या कामकाज पद्धतीवर टीका केली असून नियमांचे पालन होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस यासह फेसबुक हे एकाच कंपनीचे समाजमाध्यम असून त्याचे रिब्र्रँडग करण्याची योजना यात आहे. सिलिकॉन व्हॅलीत कंपन्यांनी त्यांची नावे बदलण्यारचे किंवा सेवा विस्तारण्याचे प्रकार नवीन नाहीत. गुगलने अशाच पद्धतीने २०१५ मध्ये अल्फाबेट इनकार्पोरेशन ही कंपनी तयार करून विस्तार केला होता, त्यात शोधन व जाहिरात या पलीकडे व्यवसायाचा हेतू होता.

दूरस्थ भागात आरोग्य तंत्रज्ञान पोहोचवण्याचेही उद्देश त्यात होते. ऑनलाइन सेवा क्षेत्रात फेसबुकचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी त्याचे नाव बदलले जाण्याची शक्यता असून लोक आभासी माध्यमात वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करीत असतात. त्याचा लाभ उठवण्याचाही कंपनीचा प्रयत्न असावा असे दिसते. व्हर्चु्अल रिअ‍ॅलटी क्षेत्रात फेसबुकने मोठी गुंतवणूक केली असून तीन अब्ज वापरकर्ते वेगवेगळ्या साधने व उपयोजनांच्या माध्यमातून एकत्र जोडले जातील असा प्रयत्न आहे.

कंपनीने मंगळवारी म्हटले आहे की, येत्या पाच वर्षात युरोपीय समुदायात १० हजार नवीन नोकऱ्या मेटॅव्हर्समध्ये तयार होतील. झकरबर्ग यांनी जुलैपासून मेटॅव्हर्सचा उल्लेख केला असून हा आता नवीन शब्द राहिलेला नाही. तीन दशकांपूर्वी एका कादंबरीत या शब्दाचा उल्लेख आला होता. नंतर त्याचा उल्लेख मायक्रोसॉफ्टनेही केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Facebook renaming signals facebook social media akp

ताज्या बातम्या