पत्नीने हुंड्याची खोटी तक्रार केल्यास पतीला घटस्फोट घेण्याचा अधिकार- सर्वोच्च न्यायालय

पत्नीने तिच्या पती आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंड्या मागितल्याची खोटी तक्रार केली असल्यास त्या पतीला पत्नीशी घटस्फोट घेण्याचा अधिकार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

हुंडाविरोधी कायद्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पत्नीने तिच्या पती आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंड्या मागितल्याची खोटी तक्रार केली असल्यास त्या पतीला पत्नीशी घटस्फोट घेण्याचा अधिकार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
हैद्राबादमध्ये येथील के. श्रीनिवास आणि के. सुनीता यांच्यात सुरु असलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हे मत मांडले. १९९५ मध्ये पत्नीने घर सोडल्यानंतर श्रीनिवास यांनी स्थानिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. मात्र यानंतर त्यांची पत्नी सुनीता यांनी श्रीनिवास व त्यांच्या कुटुंबातील अन्य सात सदस्यांविरोधात हुंडाविरोधी कायदा व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यामुळे श्रीनिवास व त्यांच्या कुटुंबीयांना काही महिने तुरुंगाची हवाही खावी लागली. कौटुंबिक न्यायालय आणि उच्च न्यायालयानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणावर निकाल देत श्रीनिवास यांना घटस्फोट घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. महिलेने क्रूरनितीने विचार करुनच खोटी तक्रार दाखल केली होती. पती व त्यांच्या कुटुंबाची नाचक्की व्हावी आणि त्यांना शिक्षा मिळावी हाच या तक्रारीमागचा उद्देश होता, असे न्या. विक्रमजीत सेन आणि पी.सी. पंत यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: False dowry charge ground for divorce supreme court rules

ताज्या बातम्या