scorecardresearch

Premium

मोठी बातमी! ३७८ दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अखेर संपलं; तंबू हटवण्यास सुरुवात

गेल्या वर्षभराहून अधिक काळ केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत होते.

(फोटो इंडियन एक्सप्रेस)
(फोटो इंडियन एक्सप्रेस)

गेल्या वर्षभराहून अधिक काळ केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करत होते. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी आंदोलन संपवून आपल्या घरी परतणार असल्याची घोषणा केली आहे.

केंद्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे. सरकारकडून आलेल्या प्रस्तावाबाबत आम्हा सर्वांमध्ये एकमत झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. आम्ही मोठ्या विजयासह घरी परत जात असल्याचे किसान मोर्चाने सांगितले. ११ डिसेंबरपासून शेतकरी आपापल्या राज्यात घरी परतणार आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ११ डिसेंबरला पंजाबला रवाना होतील.

compensation of five lakhs Nagpur flood victims demand from Chief Minister
पाच लाखांची नुकसान भरपाई द्या, नागपूरच्या पूरग्रस्तांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
youths against contracting of government jobs
सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणाविरोधात हजारो तरुण रस्त्यावर
sudhir-mungantiwar
“संजय गांधी निराधार योजनेचा निधी तत्काळ वितरित करा,” वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद
monsoon session of maharashtra assembly to begin from today
सत्तासंघर्षांच्या नव्या वळणार विधिमंडळाला पूर्णवेळ सचिव नाही!

यानंतर १३ डिसेंबर रोजी सर्व शेतकरी संघटनांचे नेते श्री दरबार साहिब, अमृतसरला भेट देतील. यासोबतच पंजाबमधील विविध जिल्ह्यांमध्ये निघालेल्या पदयात्राही १५ डिसेंबरपासून संपणार आहे. दरम्यान, १५ जानेवारीला पुन्हा शेतकरी नेत्यांची आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती यावेळी शेतकरी नेते बलवीर सिंह राजेवाल यांनी दिली.

महत्वाचं म्हणजे १९ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार तिन्ही कृषी कायदे माघारी घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतरही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. कायदे माघारी घेण्याच्या घोषणेनंतर जवळपास २० दिवसांनी आंदोलन संपवत असल्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली आहे. दिल्लीच्या सीमांवर आंदोलनकर्त्यांनी उभारेलेले तंबू सोडण्यास सुरुवात केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Farmers announces to end their protest will return to home soon hrc

First published on: 09-12-2021 at 14:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×