Farooq Abdullah Firing: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार झाडल्याची घटना समोर आली आहे. अब्दुल्ला यांच्यावर पाठीमागून गोळी झाडली पण सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे गोळी अब्दुला यांना लागली नाही. या हल्ल्यातून फारूख अब्दुल्ला थोडक्यात बचावले आहेत. जम्मूमधील ग्रेटर कैलाश परिसरात एका लग्न संमारंभात ही घटना घडली. पोलिसांनी संशयिताला अटक करण्यात आली आहे.

जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न, संशयिताला अटक

जम्मू मधील ग्रेटर कैलाश येथे एका लग्न संमारंभात फारूख अब्दुला उपस्थित होते. मंडपातून जात असताना एकाने त्यांच्यावर पाठीमागून गोळी झाडली. सुदैवाने फारूख अब्दुला या हल्लात बचावले आहेत. कमल सिंह जामवाल असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सुरक्षा रक्षकांनी संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. 

घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

गोळीबाराच्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. फारूख अब्दुल्ला मंडपातून जात असताना दबा धरुन बसलेला हल्लेखोर अब्दुल्ला असलेल्या जमावात प्रवेश करतो. पुढे जात असलेल्या अब्दुल्लांवर हल्लेखोर जवळून गोळी झाडली. सुदैवाने सुरक्षा रक्षकांमुळे अब्दुला यांच्या दिशेने झाडलेली गोळी फारूख अब्दुल्ला यांना लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले.

पॉइन्ट ब्लँकवरुन गोळी झाडण्याचा प्रयत्न

हल्लेखोर केवळ काही पावले अब्दुल्ला यांच्यापासून दूर होता. हल्लेखोराने पाठीमागून अब्दुल्ला यांच्या खांद्याला पिस्तूल लावून गोळी झाडली. पण, घटनास्थळी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी अब्दुला यांच्यावरील हल्ला चुकवल्याचे व्हिडीओत स्पष्टपण दिसत आहे. या हल्ल्यात फारूख अब्दुल्ला थोडक्यात बचावले.  हल्ला झाला त्यावेळी जम्मू काश्मीरचे विद्यमान उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील उपस्थित होते. चौधरी देखील या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.

२० वर्षांपासून फारुख अब्दुल्ला यांच्या हत्येचा प्रयत्न, संशयिताची कबुली

कमल सिंह जामवाल असे ६५ वर्षीय हल्लेखोराचे नाव असून, तो फारुख अब्दुल्ला यांच्या हत्येचा गेल्या २० वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. “माझ्याकडं असणारे पिस्तूल माझेच आहे. त्यांची हत्या करण्याचा माझा उद्देश होता. त्यांचं सुदैव म्हणून ते बचावले”, असे हल्लेखोर पोलिसांना माहिती देताना म्हणाला.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला काय म्हणाले?

“अल्लाह दयाळू आहे. माझे बाबा थोडक्यात बचावले. त्या व्यक्तीने पॉइन्ट ब्लँकवरुन गोळी झाडली. पण, सुरक्षा रक्षकांनी बाबांच्या हत्येचा प्रयत्न उधळून लावला. खूप प्रश्न निर्माण होत आहेत. झेड प्लस सुरक्षा असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या जवळ एखादा व्यक्ती कसा जाऊ शकतो”, असे ओमर अब्दुल्ला यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.