Father and daughter Died Crime News : कोलकाता शहरातील पर्णश्री भागात शुक्रवारी रात्री एक वक्ती आणि त्याच्या मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या दोन मृतांची ओळख पटली असून व्यक्तीचे नाव सजन दास (५३) आणि श्रीजा दास (२२) असे आहे. हे दोघे पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामेश्वरपूर येथील रहिवासी होते.

एका पोलीस सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांच्या चौकशीत असे आढळून आले की श्रीजा दास ऑटिस्टिक होती आणि जन्मापासूनच तिला सतत औषधे दिली जात होती.

“असा संशय आहे की सजन दास हा मुलीच्या प्रकृतीमुळे चिंतेत होता आणि तिच्या जन्मापासून उचलाव्या लागत असलेल्या वैद्यकीय खर्चाच्या ओझ्याखाली तो दबला गेला होता,” असे पोलिसांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितले.

छताच्या पंख्याच्या लोखंडी हुकला बांधलेला नायलॉन दोरी कापल्यानंतर साजन आणि श्रीजा दास दोघांनाही खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांना कोलकात्याच्या विद्यासागर स्टेट जनरल रुग्णालयात नेण्यात आले. येथे १ मार्च रोजी पहाटे १ वाजता वैद्यकीय अधिकार्‍याने त्यांना मृत घोषित केले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी गेल्या तीन वर्षांपासून मुलीचे वडील साजन दास हे काम करत होते. हे वर्कशॉप त्याने भाड्याने घेतले होते आणि तेथे ते चिमणी आणि वॉटर प्युरिफायरची विक्री आणि दुरूस्ती करून आपला उदरनिर्वाह करत होते.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी साजन दास हे त्यांच्या मुलीला कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. दुपारी १.१५ वाजता त्यांनी पत्नीला माहिती दिली होती की ते रुग्णालयात पोहचले आहेत. मात्र काही दासांनंतर जेव्हा साजन यांनी अनेकदा फोन करूनही प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्यांच्या पत्नीने जवळच्या लोकांना त्यांची माहिती घेण्याची विनंती केली.

साजन यांच्या वर्कशॉपवर गेल्यानंतर कुटुंबाच्या जवळचा मित्र रनजीत कुमार सिंह यांना दरवाजा आतून बंद असल्याचे आढळून आहे. पण जेव्हा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा त्यांना मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर साजन यांच्या पत्नीला याबद्दल कळवण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच पर्णश्री पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मृतदेह बाहेर काढले. चौकशी आणि पोस्टमॉर्टम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे अधिकार्‍याने सांगितले.