जातीबाहेरील तरुणावर प्रेम करत लग्न केल्याने बापानेच आपल्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पीडित महिला आणि आजारामुळे मृत्यू झालेल्या तिच्या आठ महिन्याच्या मुलाचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी जंगलात सापडला होता. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, चिमुरड्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आरोपी मुलीला घेऊन जंगलात गेला होता. तिथे दोघांचंही एक वर्षापूर्वी झालेल्या या लग्नावरुन भांडण झालं. यानंतर पित्याने मुलीवर बलात्कार करत गळा दाबून तिची हत्या केली. आरोपीने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.




पोलिसांनी दिलेल्या माहितीनुार, दोन दिवसांपूर्वी जंगलात मृतदेह सापडल्यानतंर तपास सुरु केली असता महिलेची ओळख पटली होती. चौकशीदरम्यान आरोपी आपल्या मुलीने वर्षभरापूर्वी पळून जाऊन लग्न केल्याने नाराज असल्याची माहिती मिळाली. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पळून जाऊन लग्न केल्यानंतर पीडित तरुणी आपल्या घरी आली नव्हती. पण दिवाळीला मोठ्या बहिणीच्या घरी आली असता आजारामुळे तिच्या मुलाचा मृत्यू झाला. यावेळी बहिणीने फोन करुन वडिलांना माहिती दिली असता ते पोहोचले होते. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.