फायझरची कमी प्रमाणातील मात्रा मुलांना देण्यास अमेरिकेत अनुकूलता

प्रौढांमध्येही ही लस वापरण्यात आली असून त्यात जास्त मात्रा देऊनही त्यांच्यात वाईट परिणाम फारसे जाणवलेले नाहीत.

वॉशिंग्टन :मुलांच्या लसीकरणाबाबत अमेरिकेने एक पाऊल पुढे टाकले असून तेथील अन्न व औषध प्रशासनाने मुलांना फायझर लशीची मात्रा कमी प्रमाणात देण्यास पािठबा दर्शवला आहे. पाच ते अकरा वयोगटातील मुलांना ही लस कमी मात्रेत देता येईल, असा सल्ला अन्न व औषध प्रशासनाच्या समितीने सरकारला दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या समितीत मुलांना फायझरची लस देण्याबाबत एकमत झाले. सर्वानीच लस देण्याच्या बाजूने मतदान केले. एक जण तटस्थ राहिला. कोविड १९ विषाणू पासून मुलांना संरक्षण देण्यासाठी फायझरची लस फायद्याची असून त्यात थोडी जोखीम असली तरी फायदे अधिक आहेत. प्रौढांमध्येही ही लस वापरण्यात आली असून त्यात जास्त मात्रा देऊनही त्यांच्यात वाईट परिणाम फारसे जाणवलेले नाहीत. मुलांना करोना विषाणूचा धोका वृद्ध लोकांपेक्षा कमी असला तरी मुलांना थोडय़ा प्रमाणात लशीची मात्रा देण्यात यावी, पण त्यासाठी पालकांची संमती घेण्यात यावी. या लशीने मुलांवर वाईट परिणाम होणार नाहीत याची खातरजमा करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सल्लागार व अरकासान्स विद्यापीठाच्या प्राध्यापक जेनेट ली यांनी म्हटले आहे, की हा विषाणू जाणारा नाही. त्याच्यासमवेत आपल्याला रहावे लागणार आहे. त्यासाठी लस हेच एक उपयुक्त साधन आहे. हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक व अन्न-औषध प्रशासनाचे सल्लागार डॉ. एरिक रुबीन यांनी म्हटले आहे, की हा निर्णय सोपा नाही. ही लस आपण मुलांना देत नाही तोपर्यंत ती किती सुरक्षित आहे हे समजणार नाही. कुठल्या वयोगटातील मुलांना ही लस द्यायची याचा निर्णय पुढील आठवडय़ात रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्र घेणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fda panel backs pfizer s low dose covid 19 vaccine for kids zws

ताज्या बातम्या