केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. याबाबत खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या बजेटचं भरभरून कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर निर्मला सीतारामन या उभं राहून जेव्हा बजेट सादर करत होत्या तेव्हा एक महिला म्हणून अभिमान वाटला. महिलांबाबतच्या योजना सादर करण्याआधी त्यांनी नारी तू नारायणी असा उल्लेख केला. ही बाब जर संपूर्ण देशाने लक्षात घेतली तर महिलांविरोधातली हिंसा थांबण्यास नक्कीच मदत होईल असेही हेमामालिनी यांनी म्हटले आहे.
#WATCH BJP MP from Mathura, Hema Malini on #UnionBudget2019: Felt great that a woman MP was presenting the Union Budget…’Nari is Narayani, agar ye humare desh mein log samajh len toh ye jo hinsa ho rahi hai mahilaon ke prati, that will stop.’ pic.twitter.com/y9yDGuJUPe
आणखी वाचा— ANI (@ANI) July 5, 2019
देशभरातल्या महिलांसाठी त्यांनी ज्या योजना सादर केल्या त्या नक्कीच महिलांचा विकास साधाणाऱ्या आहेत. एवढंच नाही तर त्यांनी तामिळ भाषेतले काही श्लोकही म्हटले. ज्या सक्षम पद्धतीने त्यांनी बजेट सादर केले ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहे असंही हेमा मालिनी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार चालू शकणार आहे ही महत्त्वाची घोषणा केली. तसेच सोनं आणि इंधन यावरचा कर वाढवला आहे त्यामुळे आता सोनं आणि पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निर्मला सीतारामन यांचे कौतुक केले आहे.