मोबाईवरून पती-पत्नीत वाद झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. पण, उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईवरून पती-पत्नीत जोरदार भांडण झालं. यानंतर पत्नी रागाने आपल्या बहिणीच्या घरी निघून गेली. याच कारणामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

नेमकं घडलं काय?

उत्तर प्रदेशातील गुलहरिया गाजीपूर गावातील बोटनपुरवा परिसरात हनुमान कश्यप नावाचा व्यक्ती पत्नी आणि कुटुंबासह राहत होता. दोन दिवसांपूर्वी हनुमानचा फोन हरवला होता. शोध घेतल्यानंतर त्याने पत्नीला मोबाईबद्दल विचारलं. कारण, हनुमानला शंका होती की, पत्नीला मोबाईलबाबत माहिती आहे. पण, पत्नीने माहिती नसल्याचं सांगितलं. यातूनच दोघांत जोरदार खडाजंगी झाली. यानंतर पत्नी आपल्या बहिणीच्या घरी निघून गेली.

delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!
nia denies allegations of unlawful actions in bengal s bhupatinagar
छाप्यांमागे दुष्ट हेतू नाही! आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीनंतर ‘एनआयए’चा खुलासा
sharmila tagore property
“मी खरेदी केलेली संपत्ती माझ्याच नावावर”, शर्मिला टागोर यांची माहिती; म्हणाल्या, “इस्लाममध्ये मृत्यूपत्र करण्याची…”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

हेही वाचा : दिल्लीत गँगवार! अंगणात बसलेल्या चौघांवर गोळीबार, जखमी तरुणांची आई म्हणाली, “माझ्या दोन्ही मुलांना…”

घरात एकट्या असलेल्या हुनमानने आपल्या शर्टाच्या साहाय्याने घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केली. जेव्हा कुटुंबीयांना हनुमानचा मृतदेह छताला लटकताना दिसला, तेव्हा त्याचा भाऊ संतारामने याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी हनुमानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

हेही वाचा : मोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती, मेहरबानला पोलिसांनी केली अटक

हुजूरपुर ठाण्याचे पोलीस अधिकारी जितेंद्र सिंह यांनी सांगितलं की, “पत्नीबरोबर झालेल्या वादानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल.” ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलं आहे.