सीपीआय नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी हे दोघं काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. मात्र आता या दोघांच्या पक्ष प्रवेशावरुन काँग्रेसमध्येच मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे. या दोघांना पक्षाने संधी दिल्यास बिहार आणि गुजरातमध्ये काँग्रेसचे दिवस पालटतील असं पक्षाच्या काही नेत्यांचं मत आहे तर दुसरीकडे या दोघांमुळे पक्षाचं फारसं भलं होणार नाही असं काही नेत्यांना वाढत आहे. अशातच काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी या पक्ष प्रवेशावरुन टोला लगावला आहे. ‘कम्युनिस्ट्स इन कांग्रेस’ या पुस्तकाची आठवण करुन देत त्यांनी एक ट्विट केलं असून आपल्याच पक्षाला त्यांनी घरचा आहेर दिल्याचं बोललं जात आहे.

लोकसभेचे खासदार असणाऱ्या तिवारी यांनी ट्विटरवरुन, “काही कम्युनिस्ट नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. आता कदाचित १९७३ च्या ‘कम्युनिस्ट्स इन कांग्रेस’ या पुस्तकाची पानं पुन्हा चाळायला हवीत. असं वाटतंय की गोष्टी जितक्या जास्त बदलतात तितत्याच त्या आधीप्रमाणे होत राहतात. आज पुन्हा हे पुस्तक वाचतो,” असं म्हटलंय. तिवारी हे गांधी कुटुंबियांच्या निकटवर्तीयांपैकी एक समजले जात असल्याने या ट्विटमुळे पुन्हा एकदा कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांच्या पक्षप्रवेशावरुन पक्षात मदतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

आधी मदत केली आता पक्षात घेणार
उत्तर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून काँग्रेसने मेवानीविरोधात उमेदवार न देता मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने या नेत्याला अप्रत्यक्षपणे मदत केली होती. आता मेवानी यांना थेट पक्षामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी यांना सोबत घेऊन काँग्रेस आपली नवीन राजकीय खेळी सुरू करणार आहे.

काँग्रेसपेक्षा सीपीआयचा अधिक यश मिळालं होतं
अनेक काँग्रेस नेत्यांचा असा विश्वास आहे की कन्हैयामुळे पक्षाला बिहारमध्ये सावरण्याची संधी मिळू शकते. बिहारमध्ये गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस काही खास कामगिरी करु शकलेली नाही. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही, मित्रपक्ष आरजेडी आणि सीपीआय (एमएल) च्या तुलनेत काँग्रेसने फारच सुमार कामगिरी केली होती. काँग्रेसने लढवलेल्या ७० पैकी केवळ १९ जागांवर त्यांना विजय मिळवता आला होता. आरजेडीने १४४ जागांपैकी अर्ध्याहून अधिक जागा जिंकल्या, तर सीपीआय (एमएल) ने १९ पैकी १२ जागा जिंकल्या जिथे त्यांनी उमेदवार उभे केले होते. त्यामुळेच कन्हैयामुळे काँग्रेसला बिहारमध्ये ‘अच्छे दिन’ येतील असा विश्वास काही नेत्यांना वाटतोय.

…तर काँग्रेसला बिहारमध्ये ‘अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा

काँग्रेसला अपेक्षा तरुण नेतृत्व मिळण्याची…
कुमार आणि मेवानी यांच्या प्रवेशामुळे नव्या दृष्टीने पक्षाला चालना मिळेल. गेल्या दोन वर्षांपासून पक्षाकडे अनेक तरुण नेत्यांनी पाठ फिरवल्याचं पहायला मिळालं आहे. ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, जितिन प्रसाद आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षाला तरुण नेतृत्वाची अधिक भासू लागली आहे. या दोघांच्या माध्यमातून ती गरज भरुन निघेल अशी काही नेत्यांना अपेक्षा आहे.

पक्षामधूनच होतोय विरोध
अशा स्थितीत कन्हैयाकडून पक्षाला काय फायदा होणार, असाही प्रश्नही काही काँग्रेस नेते विचारत आहेत. कन्हैयाचा सीपीआय नेतृत्वावर राग आहे. अशा परिस्थितीत जर त्याला काँग्रेसचे व्यासपीठ मिळाले तर त्यांचा राजकीय वजन वाढेल. पण पक्षाला काय फायदा होईल, काँग्रेसने या नफा -तोट्याचे आकलन केलं पाहिजे असं काहींचं म्हणणं आहे.