अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका ‘एअर शो’ दरम्यान दोन लढाऊ विमानांची हवेत धडक झाल्याची थरारक घटना घडली आहे. दल्लास शहरात घडलेल्या या घटनेत विमानातील सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसऱ्या महायुद्धातील ही लढाऊ विमानं या अपघातात पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत.

भर कार्यक्रमात ‘हा’ प्रश्न विचारताच लाइव्ह टीव्हीवर ढसाढसा रडला शोएब मलिक, पाहा व्हिडिओ

Thane Police Arrests, Interstate Thief Operating, Between Assam and Mumbai, Solves 22 Cases, theft of assam, thane theft, navi mumbai theft, mumbai theft, aeroplane, marathi news, crime news, robbery news,
चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक
Ship catches fire in Thailand all passengers safe
थायलंडमध्ये जहाजाला आग, सर्व प्रवासी सुखरूप
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…
Atal Setu, security of the Atal Setu
दोन महिन्यांतच अटल सेतूची सुरक्षा ऐरणीवर

दल्लास विमानतळावर आयोजित ‘एअर शो’दरम्यान ‘बोईंग बी-१७’ आणि ‘बेल पी-६३’ या विमानांची स्थानिक वेळेनुसार शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास हवेत धडक झाली. ‘फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ने (एफएए) एका निवेदनात या अपघाताची माहिती दिली आहे. ‘वर्ल्ड वार २ एअर शो’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शोमध्ये लढाऊ विमानं प्रात्याक्षिकं दाखवत असतात.

या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हवेत धडक झाल्यानंतर दोन्ही विमानं जमिनीवर कोसळतानाची दृश्य कॅमेरात कैद झाली आहेत.

T20 World Cup: “…हे एका रात्रीत घडत नाही” भारतीय संघाच्या कामगिरीवर सचिन तेंडुलकरने केलं मोठं वक्तव्य

या हल्ल्यातील पीडित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना भावनिक समुपदेशनासह सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी माहिती हँक कोट्स या हवाई दलातील अधिकाऱ्याने दिली आहे. ‘बेल पी-६३’ मध्ये फक्त वैमानिकाची तर ‘बोईंग बी-१७’ या विमानात चार ते पाच कर्मचाऱ्यांसाठी आसनक्षमता असल्याची माहितीही कोट्स यांनी दिली आहे. ‘एफएए’ आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाकडून (एनटीएसबी) या घटनेचा तपास केला जाणार आहे.