भारतातील ५ जी (5G) तंत्रज्ञानासाठी स्वदेशी बनावटीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सुविधांसह तंत्रज्ञान इतर देशांना देण्यासाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे. भारताच्या ५ जी तंत्रज्ञानाची कथा अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली नाही, असे सीतारामण यांनी अमेरिकेतील ‘जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीज’मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे.

विश्लेषण: 5G सेवेमुळे नेमका काय बदल होणार आहे? सिमकार्ड, मोबाईल, दर..जाणून घ्या सविस्तर!

देशात लॉन्च करण्यात आलेले ५ जी तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे असल्याचे सीतारामण यांनी सांगितले आहे. “देशातील या तंत्रज्ञानासाठी दक्षिण कोरियातून काही साहित्य येऊ शकतं. त्याव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही देशाकडून ते येणार नाही. हे संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान असून आगामी काळात ज्यांना ते हवं आहे, त्यांना देता येईल”, असे सीतारामण म्हणाल्या आहेत.

लॅपटॉप, संगणकाला जबरदस्त पर्याय, मायक्रोसॉफ्टचा SURFACE PRO 9 5G सह लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर

१ ऑक्टोबरला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या तारखेची इतिहासात सुवर्णाअक्षरांनी नोंद होणार असल्याचे सांगतानाच ५ जी तंत्रज्ञानामुळे भारताने दूरसंचार क्षेत्रात जागतिक मानकं स्थापित केली आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. भारतात रिलायन्स जीओ आणि एअरटेल या कंपन्याकडून ही सेवा पुरवण्यात येत आहे. एअरटेलची मार्च २०२३ पर्यंत अनेक शहरांमध्ये आणि २०२४ पर्यंत संपूर्ण भारतात ५ जी सेवा सुरू करण्याची योजना आहे.

AIRTEL 5G PLUS वापरण्यासाठी ‘या’ फोन्सना लागेल सॉफ्टवेअर अपडेट, यादीत तुमचा फोन आहे का? बघा..

‘५ जी’ चा वेग किती असेल?

मोबाइल डेटाच्या बाबतीत, ५ जी नेटवर्क ४ जी नेटवर्कच्या तुलनेत दुप्पट गती देईल. व्हिडीओ आणि चित्रपट आता काही सेकंदात फोनवर डाऊनलोड केले जातील. ४ जी मध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 100mbps स्पीड मिळतो, मात्र ५ जी मध्ये हा स्पीड 10Gbps पर्यंत जाऊ शकतो.