Forbes ची जगातील सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारामन यांना स्थान

जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल सलग दहाव्या वर्षी पहिल्या स्थानावर

फोर्ब्सनं नुकतीच जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापन किरण मजूमदार-शॉ आणि एचसीएल एन्टरप्राईझेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडार-मल्होत्रा यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

फोर्ब्सच्या जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. तसंच या यादीत कमला हॅरिस या तिसऱ्या तर निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. १७ व्या वार्षिक ‘फोर्ब्स पॉवर लिस्ट’मध्ये ३० देशांतील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

“फोर्ब्सच्या या यादीत १० देशांतील प्रमुख महिला, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी, पाच मनोरंजन क्षेत्राशी निगडित महिलांचा समावेश आहे. जरी त्यांचं वय, नागरिकत्व आणि निरनिराळ्या क्षेत्रातील त्या असतील तरी त्यांनी २०२० मध्ये आवेव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या व्यासपीठाचा योग्यरित्या केला,” असं फोर्ब्सनं म्हटलं आहे.

या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. तर एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांना ५५ वं, किरण मजूमदार शॉ यांना ६८ वं स्थान देण्यात आलं आहे. तर लँडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतीयानी यांना या यादीत ९८ वं स्थान देण्यात आलं आहे. जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल या सलग दहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत.

“एन्जेला मार्केल या युरोपमधील प्रमुख नेत्या आहेत. जर्मनीला आर्थिक संकटातून बाहेर काढून त्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध करून जर्मनीत दहा लाख निर्वासितांना राहण्याची परवानगी देणाऱ्या मार्केल यांचं नेतृत्व खंबीर आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की लोकं आता विचारू लागली आहेत की मार्केल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार?,” असंही फोर्ब्सनं म्हटलं आहे. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना या यादीत तिसरं स्थान देण्यात आलं आहे. तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी करोना महासाथीदरम्यान देशात कडक लॉकडाउन लागू करून आपल्या देशाला मोठ्या संकटातून वाचवल्यामुळे त्यांना या यादीत दुसरं स्थान देण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Finance minister nirmala sitharaman kiran mazumdar shaw in forbes 2020 list of 100 most powerful women jud

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या