वृत्तसंस्था, ब्रसेल्स : फिनलँड व स्वीडन यांनी ‘नाटो’च्या सदस्यत्वासाठी औपचारिकरीत्या अर्ज केला असल्याचे जगातील या सर्वात मोठय़ा लष्करी आघाडीचे महासचिव जेन्स स्टॉल्टेनबर्ग यांनी बुधवारी सांगितले. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाची पार्श्वभूमी या घडामोडीला आहे. ‘फिनलँड व स्वीडन यांच्या नाटोत सहभागी होण्याच्या विनंतीचे मी स्वागत करतो. तुम्ही आमचे सर्वात घनिष्ट भागीदार आहात’, असे या दोन देशांच्या राजदूतांकडून विनंती पत्रे मिळाल्यानंतर स्टॉल्टेनबर्ग यांनी पत्रकारांना बुधवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अर्जाला आता ३० सदस्य देशांचा पािठबा मिळणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला सुमारे दोन आठवडे लागण्याची शक्यता आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी फिनलँड व स्वीडन यांच्या नाटोतील सहभागाबद्दल आक्षेप नोंदवला आहे. आक्षेप नाकारण्यात आले आणि नाटो प्रवेशाबाबतची बोलणी ठरल्याप्रमाणे पार पडली, तर येत्या काही महिन्यांत हे दोन्ही देश सदस्य बनू शकतील. या प्रक्रियेला सहसा ८ ते १२ महिने लागतात, मात्र या दोन्ही नॉर्डिक देशांच्या डोक्यावर रशियाच्या धोक्याची टांगती तलवार लक्षात घेऊन नाटो ही प्रक्रिया लवकरात लवकर करू इच्छिते. उदाहरणच घ्यायचे तर, या दोन देशांच्या प्रवेशाला काही दिवसांतच मंजुरी देण्याची आपल्याला अपेक्षा असल्याचे कॅनडाने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finland sweden formally apply nato membership ysh
First published on: 19-05-2022 at 00:48 IST