नवी दिल्ली/ कोलकाता/भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये बुधवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध देवी कालीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपच्या पश्चिम बंगाल शाखेने मोईत्रा यांच्या अटकेची मागणी केली. हिंदू देवतांचा अवमान करण्याची पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्षाची ही अधिकृत भूमिका आहे का, असाही सवाल भाजपने उपस्थित केला आहे.

मोईत्रा यांनी यावर दिलेल्या  प्रत्युत्तरात म्हटले आहे, की त्या ‘देवीच्या उपासक’ आहेत आणि भाजपच्या गुंडगिरीला आपण घाबरत नाही. त्या म्हणाल्या, की सत्याला कुठल्याही कुबडय़ा घेण्याची  गरज नसते. भाजपवर ताशेरे ओढत मोईत्रा यांनी ‘ट्विट’मध्ये ‘जय माँ काली. बंगालवासीय जिची पूजा करतात. ती धैर्यवान देवी आहे.’ असे नमूद करून म्हटले, की मी काली देवीची उपासक आहे. मला कशाचीच भीती वाटत नाही. तुमच्या गुंडांची, तुमच्या पोलिसांची आणि विशेषत: तुमच्या ‘ट्रोल्स’ची भीती वाटत नाही.

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
BJP worker shiv shankar das
‘भाजपा जिंकू दे, तुला घरातून उचलून आणेन’, कार्यकर्त्याची महिलेला धमकी; पोलिसांनी केली अटक
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?

पाहा व्हिडीओ –

भाजपने मोईत्रा यांच्यावर पश्चिम बंगालचे पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत दहा दिवसांत मोईत्रांवर कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. पक्षाच्या महिला शाखेनेही शहरातील बहुबाजार पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे. दरम्यान, मोइत्रा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांकडून तीव्र टीका होत असताना, तृणमूल काँग्रेस नेतृत्त्वाने बुधवारी खुलासा करताना सांगितले की, पक्ष या मोईत्रांच्या वक्तव्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही. त्यांना भविष्यात अशी विधाने न करण्याची काळजी घेण्यास सांगितले जाईल.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ‘ट्वीट’ केले, की मोईत्रा यांनी काली देवीबाबात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर झालेल्या टीकेने मला धक्का बसला आहे. त्यांनी लोकांना थोडेसे प्रगल्भ व्हावे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. दुर्भावनेतून निर्माण केलेल्या वादाबद्दल अनभिज्ञ नाही, परंतु मोईत्रांवरील हल्ल्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मध्य प्रदेशातील पोलिसांनी बुधवारी मोईत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे, की, मोईत्रांच्या वक्तव्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मंगळवारी काली देवींवर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

मनिमेकलाईंचे वादग्रस्त ट्वीटहटवले

नवी दिल्ली : ‘ट्विटर’ने चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांचे वादग्रस्त ‘ट्विट’ काढून टाकले आहे. २ जुलै रोजी एका ‘ट्वीट’मध्ये, कॅनडातील टोरंटो येथे राहणाऱ्या मणिमेकलाई यांनी माहितीपटासंबंधीचा चित्रफलक प्रसिद्ध केला होता. त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. कायदेशीर मागणीनुसार हे ‘ट्वीट’ भारतात दाखवले जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी करून ‘ट्विटर’ने हे ‘ट्वीट ’कधी हटवले, हे स्पष्ट झालेले नाही. दिल्ली पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी वादग्रस्त ‘ट्वीट’मुळे मणिमेकलाईविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी कॅनडातील हिंदू समुदायाच्या नेत्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कॅनडाच्या अधिकाऱ्यांना चित्रपटाशी संबंधित ‘प्रक्षोभक बाबी’ काढून टाकण्याचे आवाहन केले होते.