Bhopal : कमला नेहरु हॉस्पिटलच्या चिल्ड्रन्स वॉर्डला भीषण आग; चार बालकांचा मृत्यू

सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती; ३६ मुलांना बाहेर काढण्यात यश

Kmla nehru hospital
या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. याच ठिकाणी चिल्ड्रन्स वॉर्ड आहे. (सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)

अहमदनगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीची दुर्घटना ताजी असतानाच आता एक नवी घटना समोर येत आहे. मध्यप्रदेशातल्या भोपाळ इथं कमला नेहरु रुग्णालयातल्या लहान मुलांच्या कक्षाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आत्तापर्यंत ४ मुलांचा मृत्यू झाला असून ३६ मुलांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती मिळत आहे.

या रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चिल्ड्रन्स वॉर्ड आहे. आग लागल्यानंतर रुग्णांना स्ट्रेचरवरुन बाहेर काढण्यात येत होतं. मात्र, या रुग्णांच्या कुटुंबियांना आत प्रवेश दिला जात नव्हता. आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा मात्र गोंधळ उडाल्याचं दिसत होतं.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती हाती येत आहे.

या घटनेबद्दल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला असून या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र प्रकृती गंभीर असलेल्या बालकांचा जीव वाचवता आला नसल्याची खंत त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून बोलून दाखवली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fire bhopal kamala nehru hospital children ward vsk

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य