उत्तर प्रदेश मंत्रालयात आग, मंत्री-अधिकारी बचावले

अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरीत घटनास्थळी दाखल झाल्या.

Bapu Bhavan
Bapu Bhavan: आपण सुरक्षितपणे बापू भवनमधून बाहेर पडल्याचे मंत्री मोहसीन रझा यांनी ट्विट करून सांगितले.

लखनऊमधील मंत्रालयात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागली. दुसऱ्या मजल्यावरील बापू भवनमध्ये ही आग लागली होती. आग लागल्याचे समजताच इमारत रिकामी करण्यात आली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी बापू भवनमध्ये उत्तर प्रदेश सरकारचे अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. सर्वांना लगेच बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरीत घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.


आपण सुरक्षितपणे बापू भवनमधून बाहेर पडल्याचे मंत्री मोहसीन रझा यांनी ट्विट करून सांगितले. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. यापूर्वी नोव्हेंबर २१०५ मध्येही आग लागली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fire breaks out at bapu bhawan secretariat in lucknow