चंद्रशेखर राव यांच्या चंडी यज्ञादरम्यान मंडपाला लागली आग

या यज्ञावर राव यांनी सात कोटी रुपये खर्च केले आहेत.

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर आयोजित केलेल्या चंडी यज्ञाच्या विधी सुरु असताना रविवारी दुपारी एका मंडपात आग भडकली. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती तेलंगणचे मंत्री के.टी.राव यांनी दिली.
अयुथा चंडी महायज्ञम वैश्विक कल्याण व शांतीसाठी करण्यात येत असून, तो २३ डिसेंबरला सुरू झाला आहे. या यज्ञावर राव यांनी सात कोटी रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, या यज्ञावर सरकारी पैसा खर्च केलेला नसल्याचे राव यांनी सांगितले आहे. तामिळनाडूचे राज्यपाल के. रोसय्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल या यज्ञाला उपस्थिती लावली  होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fire breaks out at k chandrasekhar raos 7 crore yagna

ताज्या बातम्या