scorecardresearch

उत्तर प्रदेशमध्ये लग्नस्थळी आग, होरपळून पाचजणांचा मृत्यू, सातजण जखमी

उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली.

उत्तर प्रदेशमध्ये लग्नस्थळी आग, होरपळून पाचजणांचा मृत्यू, सातजण जखमी
उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद शहरात लागलेली आग

उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. स्थानिकांनीही मदत कार्याला हातभार लावत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं.

ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : अंबरनाथमध्ये दोन चारचाकीने घेतला पेट; मध्यरात्रीची घटना, सुदैवाने जिवीतहानी नाही

मोरादाबादचे न्यायदंडाधिकारी शैलेंद्र कुमार सिंह म्हणाले, “मोरादाबादमधील तीन मजली इमारतीत आग लागल्याने पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर सात लोक जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य या इमारतीत राहत होते. अग्निशमन दल आगीच्या कारणाचा तपास करत आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fire broke out at wedding venue in moradabad uttar pradesh pbs