जबलपूर येथील न्यू लाईफ मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये चार रुग्णांचा समावेश आहे. दुपारी २ च्या सुमारास ही आग लागली होती. शॉटसक्रिटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेताच फडणवीसांची ४ शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, आग लागली तेव्हा रुग्णालयात एकूण २५ पेक्षा कमी लोक होते. यामध्ये चार रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि तळमजल्यावर ओपीडी चालवत असलेल्या दोन डॉक्टरांसह नऊ कर्मचारी, यांचा समावेश होता, अशी माहिती जबलपूरचे जिल्हाधिकारी डॉ. इलयाराजा यांनी दिली.

हेही वाचा – “ते काय देशाचे गॉडफादर आहेत का?”; सुनील राऊतांचे जे. पी. नड्डांना प्रत्युत्तर

आठ मृतांमध्ये चार रुग्ण आणि चार कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच पाच ण असल्याचेदेखील पुढे आले आहे. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

या रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, होज पाईप्स यांसारखी कोणतीही स्थिर अग्निशामक यंत्रणा नव्हती. इथे फक्त पोर्टेबल अग्निशामक यंत्रे होती. तसेच अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्याबद्दल नोटीस देखील बजावण्यात आली होती.