फटाक्यांमुळे दिल्लीसह उत्तर भारतात प्रदूषणवाढ

दिवाळीनंतर राजधानी दिल्लीत शुक्र वारी सकाळची हवा गंभीर श्रेणीत पोहोचली होती.

भारतात नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या अहवालानुसार पंजाब आणि हरियाणात धान काढल्यानंतर टाकाऊ पेंड्या जाळल्यामुळे उत्तर भारतात प्रदूषणात वाढ झाली आहे. मात्र, दिवाळीनंतर दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात फटाक्यांमुळे प्रदूषणात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

दिवाळीनंतर राजधानी दिल्लीत शुक्र वारी सकाळची हवा गंभीर श्रेणीत पोहोचली होती. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने फटाक्यांवर पूर्ण प्रतिबंध लावले असतानाही दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके  फोडण्यात आले. सफर या संस्थेनुसार दिल्लीची एकू ण हवा गुणवत्ता ५३१हवा गुणवत्ता निर्देशांकसह गंभीर श्रेणीत पोहोचली. यामुळे अनेक भागातील रहिवाशांना घशात आणि डोळ्यात जळजळ, पाणी येणे यासारखा त्रास जाणवला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार फु प्फु साला नुकसान पोहोचवणारे अतिसूक्ष्म कण २.५ यांचे प्रमाण ४१० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर इतके  वाढले होते. जेव्हा की हे प्रमाण गुरुवारी ते २४३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होते. हरियाणा सरकारने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात १४ जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी लावली. उत्तर प्रदेश सरकारने मध्यम व उत्कृ ष्ट हवा गुणवत्ता असणाऱ्या क्षेत्रात दोन तासांकरिता दिवाळीला हरित फटाक्यांच्या वापरावर मंजुरी दिली होती. केंद्र सरकारच्या सफार या संस्थेनुसार हवेची गुणवत्ता येत्या रविवारपर्यंत सुधारण्याचे काहीही संके त नाहीत. संपूर्ण दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक खराब श्रेणीच्याही वर असून सातत्याने तो खराब होत आहे.

जगभरात हवेतील गुणवत्तेची तपासणी करणारी आयक्यू एअर या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार शुक्र वारी दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक सर्वाधिक ४१०  होता. दिवाळीनंतर दुसऱ्या क्र मांकावर चीनमधील बिजिंग हे शहर होते. या शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक २१९ होता. तर तिसऱ्या क्र मांकावर पाकिस्तानमधील लाहोर हे शहर होते. या शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०८ होता. सर्वाधिक खराब वायू गुणवत्ता असणाऱ्या पहिल्या दहा शहरांवर नजर टाकल्यास भारतातील तीन शहरे या यादीत आहेत. यात दिल्ली सातव्या क्र मांकावर आहे. यानंतर मुंबई १६९ हवा गुणवत्ता निर्देशांकसह आणि कोलकाता १६४ हवा गुणवत्ता निर्देशांकसह ही शहरे आहेत, तर चीनमधील तीन आणि पाकिस्तानमधील दोन शहरे या यादीत आहेत. चीनमधील बिजिंग, शेनयांग १६९ निर्देशांक, वुहान १५७  आणि पाकिस्तानमधील लाहोर २०८  व कराची १८८ हवा गुणवत्ता निर्देशांकसह या शहरांचा यादीत समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Firecrackers increase pollution in north india including delhi akp

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या