नायजेरियाच्या कट्सिना राज्यातील मैगामजी गावातील एक मशिदीवर गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जमखी झाले आहेत. तसेच हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून १९ जणांचे अपहरण केले आहे. शनिवारी ( ३ डिसेंबर) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – इराणचे ‘नैतिकता पोलीस दल’ बरखास्त; हिजाबसक्तीविरोधात दोन महिन्यांच्या हिंसक आंदोलनानंतर निर्णय

इंडिया टुडेने रॉयटर्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मैगामजी गावातील एक मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी नागरिक जमले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी मशिदीत प्रवेश करत अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळाबारात १२ जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहे. यामध्ये मशिदीच्या इमामांचाही समावेश आहे. तसेच हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून १९ जणांचे अपहण केले आहे.

हेही वाचा – Hijab Ban: इराणमधल्या महिलांच्या हिजाब सक्तीविरोधातील संघर्षाला यश; ‘संस्कृतीरक्षक पोलिसां’चा गाशा गुंडाळला

दरम्यान, या घटनेचा तपास सुरू असून हल्लेखोरांच्या तावडीतून सहा जणांना वाचवण्यात यश आहे. उर्वरित नागरिकांनाही वाचवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी गॅम्बो इसाह यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firing at mosque in nigeria 12 death including imam and 19 abduct spb
First published on: 05-12-2022 at 08:54 IST